Mumbai Pune Expressway: प्रवाशांनो लक्ष द्या! जर तुम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पनवेल एक्झिट पुढील सहा महीने बंद ठेववण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ६ महीने येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उडड्राणपुल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे. येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा मार्ग ११ फेब्रुवारीपासून पुढील ६ महिने हा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या (हलकी व जड अवजड वाहने) वाहनांसाठि बंद राहणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पनवेल एक्झीट हा मार्ग पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. या बाबत नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त तिरुपती काकडे यांनी नोटिस जारी केली आहे.
एक्सप्रेसवे वरील पनवेल एक्झिट ६ महीने बंद राहणार असल्याने येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (कि.मी. ९.६००) येथे डावीकडे वळण घावे लागणार आहे. त्यानंतर एनएच ४८ मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जावे लागणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरून (पनेवल एक्झीट) येथून तळोजा, कल्याण- शिळफाटयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरून पुरूषार्थ पेट्रोलपंप उडड्राणपुलाखालून उजवीकडे वळण घेवून रोडपाली येथून एन.एच ४८ महामार्गावरून इच्छितस्थळी जातील. या साठि येथे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
या वाहतूक बदलांची नोंद घेऊन या मार्गाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या दिलगिरी बद्दल देखील क्षमस्व असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या