मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde Property : पंकजा मुंडे यांच्यावर पावणे तीन कोटींचं कर्ज, स्वत:ची गाडीही नाही, किती आहे त्यांची संपत्ती?

Pankaja Munde Property : पंकजा मुंडे यांच्यावर पावणे तीन कोटींचं कर्ज, स्वत:ची गाडीही नाही, किती आहे त्यांची संपत्ती?

Jul 03, 2024 11:49 AM IST

Pankaja Munde Property : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. किती आहे त्यांची संपत्ती? जाणून घेऊया…

पंकजा मुंडे यांच्यावर पावणे तीन कोटींचं कर्ज, स्वत:ची गाडीही नाही, किती आहे त्यांची संपत्ती?
पंकजा मुंडे यांच्यावर पावणे तीन कोटींचं कर्ज, स्वत:ची गाडीही नाही, किती आहे त्यांची संपत्ती?

Pankaja Munde Property : राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, पंकजा मुंडे यांच्यावर सुमारे पावणे चार कोटींचं कर्ज आहे. त्यांच्याकडं स्वत:ची एकही गाडी नाही. स्थावर व जंगम मिळून त्यांची संपत्ती सुमारे ७ कोटी रुपयांची आहे.

पंकजा मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व समाजसेवा आहे. शेती, भाडे व माजी विधानसभा सदस्यांचं निवृत्तीवेतन हा त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पंकजा मुंडे यांच्या संपत्तीचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…

४५ तोळं सोनं

नावावर एकही गाडी नाही. 

विविध बँक खात्यात ९१ लाख २३ हजार ८६१ रुपयांच्या ठेवी

सोने - ४५० ग्रॅम. किंमत - ३२ लाख ८५ हजार

चांदी - चार किलो. किंमत ३ लाख २८ हजार 

शेअर व म्युच्युअल फंडात १ कोटी २८ लाख ७५ हजार ६९४ रुपयांची गुंतवणूक

स्थावर मालमत्तेची एकूण किंमत - ९६ लाख ७३ हजार ४९० रुपये

जंगम मालमत्तेची एकूण किंमत - ६ कोटी ८ लाख १५ हजार ७०९ रुपये

एकूण कर्ज - २ कोटी ७४ लाख ८९ हजार ५१८ रुपये

पतीच्या नावावर बँक कर्ज - २ कोटी ५० लाख ३२ हजार ४२७ रुपये

पतीच्या नावे वैयक्तिक कर्ज - २४ कोटी ७७ लाख ७५ हजार ९१८

रोख रक्कम - २ लाख ८४ हजार ५३०

इतर दागिने - २ लाख ३० हजार

शेती अवजारे - ४० हजार रुपये

कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स- १५ हजार ८०० रुपये

पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे यांची संपत्ती किती?

सोनं - २०० ग्रॅम - मूल्य १३ लाख

चांदी - २ किलो - मूल्य १ लाख ३८ हजार

इतर दागिने - २ लाख १५ हजार

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर