मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde: मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत...; पंकजा मुंडेंचा मोठा निर्धार

Pankaja Munde: मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत...; पंकजा मुंडेंचा मोठा निर्धार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jun 30, 2023 07:19 PM IST

Pankaja Munde On Maratha Reservation: बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde

Pankaja Munde Speech In Beed: राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी सध्या न्यायालयीन लढाई लढली जात आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावरून मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला राजेंद्र मस्के यांनी मला फेटा बांधण्याचा आग्रह केला. परंतु, मी त्यांना नकार दिला. मराठी समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितले होते, मी गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही. आरक्षण वाचले. मग लोकांना दम पडला नाही, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, "आपल्याला दुधही पोळलेले असून आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष इतिहास घडवणारे म्हणजेच इतिहास बदलणारे वर्ष आहे.मला माध्यमांनी विचारलं, तुम्ही आमदार, खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्य नसतानाही इतर पक्ष तुम्हाला ऑफर देत आहेत. यावर मी म्हटले की, याबाबत मला माहिती नाही. पण, मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे."

WhatsApp channel