Pankaja Munde : भाजप फुटेल असा दिवस येऊ नये; पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde Live : भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे आज दुपारी साडेबारा वाजता मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस प्रवेशाचं वृत्त त्यांनी यावेळी स्पष्टपणे खोडून काढलं.
Pankaja Munde (HT_PRINT)
Pankaja Munde Live : भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे आज दुपारी साडेबारा वाजता मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस प्रवेशाचं वृत्त त्यांनी यावेळी स्पष्टपणे खोडून काढलं. भारतीय जनता पक्ष फुटेल असा दिवस येऊ नये, असं सूचक विधानही त्यांनी सध्याच्या घडामोडींबद्दल बोलताना केलं.
ट्रेंडिंग न्यूज
पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- परळी विधानसभा मतदारसंघात पुढच्या निवडणुकीत नेमकं काय होईल, याचं उत्तर ज्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला ते देतील. पक्षात एक व्यवस्था आहे, ते यावर बोलू शकतील - पंकजा मुंडे
- धनंजय मुंडे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. ते मला भेटायला आले होते. आपल्या संस्कृतीनुसार ते आले तेव्हा मी त्यांचं औक्षण केलं. मंत्री झाले त्याचा आनंदच आहे - पंकजा मुंडे
- गेल्या २० वर्षांत मी एकदाही सुट्टी घेतलेली नाही. आता मला थोडा ब्रेक घ्यावा लागणार आहे. मी ऑफिशियल सुट्टी घेणार आहे. अंतर्मुख होऊन विचार करणार आहे - पंकजा मुंडे
- विचारांशी तडजोड करावी लागेल अशी वेळ आल्यास मी राजकारणाला रामराम ठोकेन - पंकजा मुंडे
- सध्याच्या राजकारणातले प्रयोग कोविडसारखे नवीन आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही असं बोललं जातं. पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयींचा भाजप राहिला नाही असं कुणी म्हणू नये असं मला वाटतं. भाजप फुटेल असा दिवस येऊ नये - पंकजा मुंडे
Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून म्हणाले…
- मी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना समोरासमोर पाहिलेलंही नाही. मी कुठलीही गुप्तता पाळत नाही. जे काही असतं ते सोशल मीडियात दिसतं - पंकजा मुंडे
- भारतीय जनता पक्षाचे विचार माझ्या रक्तात आहेत. पक्षाचा प्रत्येक आदेश मी शिरसावंद्य मानलाय. मग अशी बातमी का येते? या चॅनेलला माहिती कोणी दिली?; पंकजा मुंडे यांचा प्रश्न
- माझं करिअर कवडीमोलाचं नाही. २० वर्षे मी राजकारणात आहे. माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार झाले आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचा माझा स्वभाव नाही - पंकजा मुंडे
- मी काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची बातमी आली होती. पण ती चुकीची होती. संंबंधित चॅनेलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे - पंकजा मुंडे
- २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर अनेक घटना घडल्या. निर्णय झाले. त्यानंतर मी नाराज असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या. त्यावर मी भूमिका मांडली आहे. पुन्हा-पुन्हा मी त्यावर बोलणं हे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे - पंकजा मुंडे
- पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू
Neelam Gorhe: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; नीलम गोऱ्हे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजांचा पराभव केला होता. आता तेच भाजपच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यानं पंकजा यांची राजकीय अडचण झाल्याचं बोललं जातंय. त्यावर त्या काय बोलतात याकडंही लक्ष लागलंय.
- काँग्रेस प्रवेशाबद्दल पंकजा मुंडे नेमंकी काय भूमिका मांडणार याविषयी उत्सुकता
- पंकजा मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद