Chandrakant Patil : पंकजा मुंडेंचे 'ते' वक्तव्य करण्याचा कोणताही हेतू नव्हता; चंद्रकांत पाटील यांची सारवासारव
Chandrakant Patil on Pankaja Munde statement : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांनी ठरवले तरी मला ते संपवू शकणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे भाजपनेते सारवासारव करायला लागले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते व्यक्तव्य करण्याचा पंकजा यांचा हेतु नव्हता असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 'तप्रधान नरेंद्र मोदी ठरवले तरी ते मला संपवू शकणार नाही', असे वक्तव्य करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. त्यांचे भाषणातील मागील व पुढील वक्तव्ये सोडून केवळ एकच वक्तव्य दाखविल्याने अशाप्रकारे गैरसमज होतात. केंद्रीय नेतृत्वाबाबत प्रसारमाध्यमांनी ‘ध’चा ‘मा’ केला, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले.
ट्रेंडिंग न्यूज
वडगाव मावळ येथे पोटोबा महाराज मंदिर याठिकाणी देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सरस्वती व्याख्यानमाला येथे भेट दिल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कोरोना नंतर सर्वच सण आज मोठ्या उत्साहाने लोक साजरे करत आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला आहे. आता नवरात्री, दसरा, दिवाळी हे सर्वच उत्सव उत्साहाने साजरे केले जातील. कोरोनाची भिती कमी झालेली असून हिंदूच्या अशाप्रकारच्या उत्सवाने बेशिस्त न होता थोडे स्वातंत्र्य देणारे सरकार सत्तेत आल्यामुळे हे नाही, ते नाही असा विषय बंद झालेला आहे. लोकांनी पुरेशी काळजी घेऊन सण साजरे करावेत. गणपतीत थोडा अतिरेक झाला त्यामुळे अतिरेक नागरिकांनी टाळावा. कारण अतिरेकामुळे पुन्हा निर्बंधाकडे वाटचाल होते.
सामाजिक, राजकीय नेत्यांनी प्रत्येक वक्तव्य विचारपूर्वक करावे, लोकशाहीने आपल्याला अधिकार दिले परंतु सर्वांनी एकाचवेळी व्यक्त होण्यावर मर्यादा असली पाहिजे. सामनातून भाजप पक्ष व नेत्यावर सातत्याने टिका करण्यात येते. परंतु त्यांनी सत्तेत असताना अडीचवर्ष काय केले. निवडणुक निकालानंतर जनतेचा कसा विश्वासघात केला हे राज्याने पाहिलेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत काम सुरु केले आहे. सन २०१९ मध्ये एकत्रित निवडणुक लढविण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करुन, सभा घेऊन निवडणुक जिंकल्या. स्व. बाळासाहेब ठाकरे हे नेहमी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करत राहिले परंतु नंतर त्यांनाच जाऊन भेटण्याचे काम उध्दव ठाकरेंनी केले. लोकांची स्मरणशक्ती विसरणारी नसून त्यांना सर्व गोष्टी माहिती आहे.
संबंधित बातम्या