pangolin smuggling : पुण्यात खवले मांजराची तस्करी! ६ आरोपींना वनकोठडी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pangolin smuggling : पुण्यात खवले मांजराची तस्करी! ६ आरोपींना वनकोठडी

pangolin smuggling : पुण्यात खवले मांजराची तस्करी! ६ आरोपींना वनकोठडी

Published Feb 19, 2024 05:56 AM IST

Pune pangolin smuggling : जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजरांची तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आली आहे.

Pune pangolin smuggling
Pune pangolin smuggling

Pune pangolin smuggling : जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजरांची तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आली आहे. खवले मांजर (इंडियन पँगोलीन) हा शेड्युल १ मध्ये येत असून त्याची तस्करी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

Maharashtra weather update : राज्यात थंडी वाढणार तर उत्तर भारतात पावसाचा प्रकोप; पुढील काही दिवस असे असेल हवामान

रोहीदास पंढरीनाथ कुळेकर (वय ५५), कांताराम सखाराम वाजे (वय ४९, दोघे रा. भोमाळे, ता. खेड), सखाराम बबन मराडे (वय ४३, रा. पाभे ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे (वय ३१, रा. तळेराण, ता. जुन्नर), जालिंदर कान्डु कशाळे (वय ६५, रा. बडेश्वर, ता. मावळ), गीता नंदकुमार जगदाळे (रा. चव्हाणवस्ती कुमठे ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर (वय ३२, रा. करंजाळे, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेलेल्या आरोपींची नवे असून, त्यापैकी ६ आरोपीना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना वनकोठडी देण्यात आली आहे.

Pune Traffic News : शिवजयंतीनिमित्त आज पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत मोठा बदल, ‘या’ रस्त्यावरील वाहतूक वळवली

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली.

वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर १९२६ या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक श्री. पाटील यांनी केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर