मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashadhi wari: ना ठाकरे.. ना फडणवीस, यंदा विठ्ठलाची शासकीय पूजा करणार एकनाथ शिंदे

Ashadhi wari: ना ठाकरे.. ना फडणवीस, यंदा विठ्ठलाची शासकीय पूजा करणार एकनाथ शिंदे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 30, 2022 09:11 PM IST

राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? की फडणवीस जाणार या चर्चांना ऊत आला होता. याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

यंदा विठ्ठलाची शासकीय पूजा करणार एकनाथ शिंदे
यंदा विठ्ठलाची शासकीय पूजा करणार एकनाथ शिंदे

Ashadhi Wari : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा उलटफेर आज राजभवनात पाहायला मिळाला. दुपारपर्यंत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अशी चर्चा होती. मात्र शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन एक अनपेक्षित घोषणा केली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. या घोषणेबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावरील यंदा आषाढीची शासकीय पूजा कोण करणार हा संभ्रम देखील दूर केला आहे .

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे.  कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षे वारीवर बंदी होती. मात्र दोन वर्षानंतर संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालख्या ९ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होतील. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे  शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेना मिळणार आहे. 

राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? की फडणवीस जाणार या चर्चांना ऊत आला होता.  सोशल मीडियावर अनेक मिम्स देखील व्हायरल झाले होते.  फडणवीसांच्या घोषणेनंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीनंतर राज्य सरकार जाणार हे स्पष्ट होते. त्यामुळे यंदाची एकादशीची पूजा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार की देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार हा प्रश्न  चर्चेत होता. मात्र आजच्या घडामोडींमुळे दोघांच्याही हस्ते विठ्ठलाची पूजा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

IPL_Entry_Point