मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sant Chokhamela Mandir : पंढरपुरातील संत चोखामेळा मंदिर कोसळलं, मूर्तीचंही नुकसान

Sant Chokhamela Mandir : पंढरपुरातील संत चोखामेळा मंदिर कोसळलं, मूर्तीचंही नुकसान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 08, 2023 07:46 PM IST

Sant Chokhamela Mandir collapsed : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या पंढरपुरातील संत चोखामेळा मंदिर कोसळल्याचं समोर आलं आहे.

Pandharpur
Pandharpur

Sant Chokhamela Mandir collapsed : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या पंढरपुरातील संत चोखामेळा मंदिर अचानक कोसळल्याचं समोर आलं आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर कोसळल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत असून या प्रकारानंतर भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

पंढरपूर येथील तुळशी वृंदावनात हे मंदिर होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून विठ्ठल मंदिराच्या जवळ तुळशी वृंदावन साकारलं आहे. विठ्ठलाला प्रिय असलेल्या तुळशीचे विविध प्रकार भाविकांना पाहता यावेत हा यामागचा प्रमुख उद्देश होता. या वृंदावनात सात प्रमुख संतांची संगमरवरी मंदिरंही उभारण्यात आली होती. कोट्यवधी रुपये खर्चून चार वर्षांपूर्वी हे काम झालं होतं. २०१९ साली या तुळशी वृंदावनाचं लोकार्पण करण्यात आलं होतं.

Sant Chokhamela Mandir
Sant Chokhamela Mandir

याच तुळशी वृंदावनात संत चोखामेळा यांचं मंदिर होतं. ते मागच्या दोन दिवसात पडलं आहे. कोसळलेल्या मंदिरातील चोखामेळा यांची मूर्ती देखील तुटली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं हे मंदिर कोसळल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळंच हा प्रकार घडला असावा, असाही आरोप स्थानिक नागरिक व भाविकांनी केला आहे. राज्य सरकार आता याबाबत नेमका काय खुलासा करते याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग