Pandharpur Chaitri yatra : पंढरपूरच्या (Vitthal Rukmini Mandir Pandharpur) चैत्री यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ते २१ एप्रिल दरम्यान पंढरपुरात चैत्री यात्रा (Pandharpur Chaitri yatra) भरणार आहे. यात्राकाळात भाविकांना पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसभर विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनाची बैठक बोलावून याबाबत सूचना दिल्या आहेत.
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असून विठ्ठल मूर्ती काचेच्या पेटीत बंद असून देवाच्या पायावरील दर्शन पूर्ण बंद करण्यात आले आहे. यात्रा काळात पहाटे पाच ते रात्री १२ वाजेपर्यंत मुखदर्शन घेता येणार आहे. सध्या ते पहाटे पाच ते सकाळी १० वाजेपर्यंतच भाविकांना मुखदर्शनाचा लाभ घेता येतो.
प्रशासनाच्या निर्णयाने लाखोंच्या संख्येने चैत्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. यात्रा कालावधीमध्ये म्हणजे १५ ते २१ एप्रिल दरम्यान विठुरायाचे मुखदर्शन रात्री १२ वाजेपर्यंत घेता येणार आहे. रात्री १२ ते पहाटे पाच या काळात केवळ मुखदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. दर्शन रांगेसाठी गोपाळपूर येथे पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सुरु आहे. सध्या तापमान वाढल्याने दर्शन रांगेत पंखे, कुलर आणि थंड पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
चैत्री एकादशी १९ एप्रिल रोजी असल्याने या दिवशी भाविकांची संख्या सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. भाविकांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपययोजना केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध केली आहे.
प्रशासनाच्या बैठकीत खालील उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या -