मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandhari Sheth Phadke : प्रसिद्ध गाडामालक पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Pandhari Sheth Phadke : प्रसिद्ध गाडामालक पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 21, 2024 06:08 PM IST

Pandhari Sheth Phadke death news : गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरीशेठ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Pandhari Sheth Phadke
Pandhari Sheth Phadke

Pandhari Sheth Phadke Death: प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे निधन झाले. पंढरीनाथ हे आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरीशेठ यांच्या निधनाने बैलगाडाशर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

पंढरीनाथ फडके महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसीएशनच अध्यक्ष होते. बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता. पंढरीनाथ फडके यांना कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांच्या मृत्यूने बैलगाडा शर्यत असोशियएशनला मोठा धक्का लागला आहे.

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांची एन्ट्री, अंगावरील सोने आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याची स्टाईलने अनेकांना आकर्षित केले. त्यांना आवडलेला बैल ते कधीच जाऊ दिला नाही, मग त्यासाठी कितीही पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असायची.

अंबरनाथ शहरात कल्याणच्या आडीवली गावात काही दिवसांपूर्वी राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी फडके यांच्यासह एकूण ३२ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा पंढरीनाथ यांना अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती.

IPL_Entry_Point

विभाग