मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा कासारा घाटात अपघात! इंजिनचे कपलिंग तुटल्याने बोगी गेली पुढे; एक तास वाहतूक ठप्प
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा कासारा घाटात अपघात! इंजिनचे कपलिंग तुटल्याने बोगी गेली पुढे; एक तास वाहतूक ठप्प

मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा कासारा घाटात अपघात! इंजिनचे कपलिंग तुटल्याने बोगी गेली पुढे; एक तास वाहतूक ठप्प

Jul 06, 2024 12:49 PM IST

panchvati express accident : कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्सप्रेसचे कपलींग तुलत्याने अपघात झाला आहे. या आपघतामुळे एका तासापासुन मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा कासारा घाटात अपघात! इंजिनचे कपलिंग तुटल्याने बोगी गेली पुढे; एक तास वाहतूक ठप्प
मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा कासारा घाटात अपघात! इंजिनचे कपलिंग तुटल्याने बोगी गेली पुढे; एक तास वाहतूक ठप्प

panchvati express accident : रेल्वेचे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मनमाड-कसारा घाटादरम्यान अपघात झाला आहे. पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने हा अपघात झाला आहे. या एक्सप्रेसच्या इंजिनची एक बोगी कपलिंग तुटल्याने पुढे गेली. या अपघातात सुदैवाने काही हानी झाली नसली तरी या मार्गावरची रेल्वेसेवेवर परिमाण झाला आहे. सुमारे एक तास या मार्गावरची रेल्वेवाहतूक ही ठप्प झाली होती.

पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कसारा घाटात अचानक तुटली. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. एक बोगी एकीकडे तर संपूर्ण रेल्वे दुसरीकडे राहिली होती. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासानाने याची तातडीने दखल घेतली. अभियंतांचे एक पथक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने बोगीला कपलिंग बसवत एक्सप्रेसला बोगी जोडली.

हा अपघात झाला तेव्हा बोगी रेल्वे पासून वेगळी होऊन ती मुंबईच्या दिशेने पुढे गेली. कपलिंग तुटल्याने इंजिन व एक डब्बा वेगळा झाला. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस ने कसारा स्थानक सोडल्याच्या काही अंतरावर ही दुर्घटना घडली. कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्सप्रेसचे कपलींग तुटले, एका तासापासुन मुंबई कडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली होती, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर त्यांनी तातडीने दुसरुस्तीचे काम हाती घेतले. यानंतर सकाळी ९.५० च्या आसापास या मार्गावरची वाहतूक ही सुरुळीत करण्यात आली.

अपघातात वाढ

रेल्वेच्या अपघातात गेल्या काही दिवसांनपासून वाढ झाली आहे. बंगाल येथे दोन रेल्वेची धडक झाल्याने २० जणांचा मृत्यू झाला होता. तर रेल्वेट्रक वरून गाड्या डी रेल होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. या वाढत्या आपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हे वाढलेले अपघात कमी करण्यासाठी कायम स्वरूपी ठोस यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर