मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 06, 2024 01:20 PM IST

Two youths Jumped into Dabhosa waterfall: पालघर येथील दाभोसा धबधब्यावर सहलीसाठी गेलेल्या दोन तरुणांनी १२० फूट उंचीवरून पाण्यात उडी घेतली.

मित्रांसोबत दाभोसा सहलीला गेलेल्या २ तरुणांनी चक्क १२० फूट उंचीवरून पाण्यात उडी घेतली.
मित्रांसोबत दाभोसा सहलीला गेलेल्या २ तरुणांनी चक्क १२० फूट उंचीवरून पाण्यात उडी घेतली.

Palghar News: दोन तरुणांचा १२० फूट उंचीवरून तलावात उडी मारल्याचा व्हिडिओ समोर आला. या घटनेत एका जणांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महाराष्ट्रातील पालघरचे आहे. जव्हार परिसरातील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर तीन मित्र सहलीसाठी गेले असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

मिळालेल्या माहितीनुसार, माज शेख (वय, २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. माज शेख हा आपल्या दोन मित्रांसह रविवारी सहलीला पालघर येथील दाभोसा धबधब्यावर गेले, जिथे माज शेख आणि त्याचा मित्र जोएब यांनी १२० फूट उंचीवरून उडी मारली. दोन्ही तरुण बराच वेळ बाहेर न आल्याने व्हिडिओ बनवणारा तिसरा तरुण त्यांना बघायला जातो. काही वेळाने जोएब पाण्यातून बाहेर येतो आणि दगडावर बसतो. पण माज बाहेर येत नाही. त्यावेळी त्यांच्या सोबत गेलेल्या एका मित्राने जोएबला माज कुठे आहे, असे विचारले असता तो काहीच बोलू शकला नाही. काही क्षणातच त्याची प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर जोएबला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

जोएबची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली. व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाची पोलिस चौकशी करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांचे जबाबही घेण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

पुणे: क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागल्याने ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुण्यात लोहगाव येथे गुरुवारी क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागल्याने ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे असे दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. शौर्य हा इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. शाळेल्या सुट्ट्या लागल्यामुळे तो गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास लोहगावमधील जगद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात क्रिकेट खेळायला गेला. त्यावेळी चेंडू गुप्तांगावर लागल्याने तो जमीनीवर कोसळला. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

IPL_Entry_Point