मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Train Accident : पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत; डझनभर गाड्या रद्द, अनेक एक्सप्रेसचे मार्ग बदलले

Palghar Train Accident : पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत; डझनभर गाड्या रद्द, अनेक एक्सप्रेसचे मार्ग बदलले

May 28, 2024 08:41 PM IST

Palghar Train Accident :पालघर यार्डात सायंकाळी पाचच्या सुमारास मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानं मुंबई-सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गाड्या रद्द करण्यात आ्ल्या असून अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

मालगाडी रुळावरून घसरल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत
मालगाडी रुळावरून घसरल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Palghar Train Accident : पालघर रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी सायंकाळी गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एका मालगाडीचे ६ डबे रुळावरून खाली घसरले. या अपघातामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (PRO) सुमित ठाकुर यांनी सांगितले की, हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास झाली. यामध्ये (Palghar goods train derails) कोणतीही जिवीतहानीचे वृत्त नाही. ही मालगाडी पनवेलला जात होती व त्यावर लोखंडी तारचे बंडल (आयरन कॉइल) ठेवले होते. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पश्चिम रेल्वेने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी पालघर यार्डमध्ये पॉइंट नंबर ११७/११८ वर एका मालगाड़ीचे ६ वॅगन आणि एक वीबीजी रुळावरून घसरली. यामुळे मुंबई-सूरत मार्गावरील अप लाइनवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

खालील ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत -

 • ट्रेन नंबर ९३०२८ (डहाणू रोड- विरार)
 • ट्रेन नंबर ९३०३० (डहाणू रोड-चर्चगेट)
 • ट्रेन नंबर ९३०३२ (डहाणू रोड-चर्चगेट)
 • ट्रेन नंबर ९३०३४ (डहाणू रोड-चर्चगेट)
 • ट्रेन नंबर ९३०३६ (डहाणू रोड-विरार)
 • ट्रेन नंबर ९३०३८ (डहाणू रोड-विरार)
 • ट्रेन नंबर ९३०३९ (विरार- डहाणू रोड)
 • ट्रेन नंबर ९३०३१ (दादर- डहाणू रोड) विरार पर्यंत धावेल.
 • ट्रेन नंबर ९३०३३ (विरार- डहाणू रोड)
 • ट्रेन नंबर ९३०३२ (विरार- डहाणू रोड)
 • ट्रेन नंबर ९३०३७ (चर्चगेट- डहाणू रोड)

Palghar Railway news : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरून घसरली! सुरत-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत

 

अपघातामुळे या ट्रेन प्रभावित -

रेल्वेने सांगितले की, अपघातानंतर गाडी नंबर १२९३६ सूरत-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसला वापीमध्ये शॉर्ट टर्मिनेट केले आहे. तसेच १६५०५ गांधीधाम-एसबीसी एक्सप्रेस, १२४३२ निज़ामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि १९२६०  भावनगर-कोचुवेली एक्सप्रेस सुअराट-उधना-जलगाव-कल्याण मार्गाने डायवर्ट केले आहे.. 

खालील गाड्या केल्या शॉर्ट टर्मिनेट -

गाडी नंबर ०९१६० वलसाड-बांद्रा टर्मिनस उमरगाव रोड पर्यंत धावेल.

 ०९१८६ कानपुर-मुंबई सेंट्रल

०९०५६ उधना-बांद्रा टर्मिनस भिलाड पर्यंत धावेल. 

१२९३६ सूरत-बांद्रा टर्मिनस, वापीपर्यंत धावेल.

१९४२६ नंदुरबार - बोरीवली एक्सप्रेस वलसाडमध्ये शॉर्ट टर्मिनेट. 

१९१०२ सूरत-विरार एक्सप्रेस बिलिमोरा मध्ये तर 

०९१८० सूरत-विरार उधनामध्ये शॉर्ट टर्मिनेट.

टी-२० वर्ल्डकप २०२४