Palghar rain : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू-विरार लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५-३० मिनिटं उशिराने
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar rain : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू-विरार लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५-३० मिनिटं उशिराने

Palghar rain : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू-विरार लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५-३० मिनिटं उशिराने

Updated Jun 20, 2024 10:49 AM IST

Dahanu Virar Local Disrupted: पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या डहाणू- विरार लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. (HT)

Mumbai Local News: मुसळधार पावसामुळे मुंबईची 'लाइफलाईन' म्हणून ओळख असलेल्या लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी रुळांजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा संथ गतीने सुरू आहे. डहाणू- विरार लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. गाड्या उशिराने धावत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर, प्रवाशी रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाट पाहत आहेत. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवर बांधलेला पूल पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे पालघर-मनोर वाडा हा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने आज पालघर, रायगड, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई शहरातील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस पडत आहे. मुंबईतील विविध भागात गेल्या २४ तासांत ६.३ ते २० मीलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत कमाल आणि किमान तापमान ३० आणि २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातही पाऊस पडत आहे. मान्सूनच्या आगमनाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुंबईसह राज्याच्या इतर भागात असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने बुधवारी सकाळी ८.२५ वाजता संपलेल्या २४ तासांत २० मिलिमीटर आणि सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० दरम्यान ६.३ मिलिमीटर पावसाची नोंद केली. कुलाबा वेधशाळेने बुधवारी सकाळी साडेआठ ते साडेसहा या वेळेत ८.२ मिलिमीटर पावसाची नोंद केली. १९ जून रोजी सकाळी ८.३० ते २१ जून रोजी पहाटे ५.३० या वेळेत वेधशाळेने २८ मिलिमीटर पावसाची नोंद केली. दहिसर वेधशाळेने १९ जून रोजी सकाळी ८.३० ते २१ जून रोजी पहाटे ५.३० या कालावधीत ११८ मिमी पावसाची नोंद केली. याच कालावधीत मीरारोड वेधशाळेत ९५.५ मिमी, भाईंदरमध्ये ७३.० मिमी, राम मंदिरात ४५.० मिमी, मुंबई विमानतळावर ३१ मिमी पावसाची नोंद झाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर