Palghar News : पालघर रेल्वेस्टेशन जवळ मंगळवारी गुजरात येथून मुंबईला जाणाऱ्या मालगाडीचे डब्बे घसरले. यामुळे ट्रॅक क्रमांक दोन, तीन, चार हे नादूरुस्त झाल्याने या मार्गावरची लोकलसेवा ठप्प झाली आहे. आज सकाळी पहाटे पाच पासून डहाणू-विरार मार्गावर लोकलसेवा बंद असल्याने मुंबईला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहे.
पालघर रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी सायंकाळी गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एका मालगाडीचे ६ डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. आज सकाळपासून डहाणू विरार मार्गावरील अनेक लोकल या रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. असे असले तरी लोकल रद्द झाल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. या मार्गावरील अप व डाऊन या दोन्ही मार्गावर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या अपघाताचा परिमाण हा लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला आहे. अनेक गाड्या या उशिराणे धावणार आहे. सध्या ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू असले तरी याला आणखी थोडा उशीर लागणार आहे.
आज सकाळी मुंबईला कामाला जाणाऱ्यांनी येथील रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. डहाणू रोड- विरार ट्रेन नंबर ९३०२८, डहाणू रोड-चर्चगेट ट्रेन नंबर ९३०३०, डहाणू रोड-चर्चगेट ट्रेन नंबर ९३०३२, डहाणू रोड-चर्चगेट ट्रेन नंबर ९३०३४, डहाणू रोड-विरार ट्रेन नंबर ९३०३६, डहाणू रोड-विरार ट्रेन नंबर ९३०३८, विरार- डहाणू रोड ट्रेन नंबर ९३०३९, दादर- डहाणू रोड ट्रेन नंबर ९३०३१, विरार- डहाणू रोड ट्रेन नंबर ९३०३३, विरार- डहाणू रोड ट्रेन नंबर ९३०३२, चर्चगेट- डहाणू रोड ट्रेन नंबर ९३०३७ या लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म १० व ११च्या विस्तार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी १ आणि २ जून रोजी ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल ६०० लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहे.
संबंधित बातम्या