मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Accident : भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

Palghar Accident : भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 30, 2023 03:45 PM IST

Palghar Accident : पालघरमध्ये मनोर-विक्रमगड मार्गावर बस व डंपरच्या झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी झाले आहेत.

Palghar Accident
Palghar Accident

एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पालघर जिल्ह्यातील मनोर-विक्रमगड मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास झाला. या अपघातात बसमधील जवळपास २० प्रवासी  जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघरमधील  मनोर विक्रमगड रस्त्यावर बस आणि डंपरमध्ये भीषण धडक झाली. एसटी बस  बोरांडा येथे आल्यानंतर समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून १५ ते २० प्रवाशी जखमी झाले आहेत. या धडकेत बसच्या समोरील भागाचा पार चक्काचूर झाला आहे. 

अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

शाळेची सहल घेऊन जाणारी बस उलटली; २ ठार ५५ जखमी

पुण्यातून शाळेची सहल घेऊन जाणाऱ्या एका बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ही बस कोंडेघर गाव हद्दीत उलटली असून यात दोघे ठार झाले आहे तर ५५ जण जखमी झाले आहे. मृतांची नावे समजू शकली नाही. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथक रवाना झाले आहे. दरम्यान अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य राबवून बसमध्ये अडकले असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.

WhatsApp channel