Palghar Murder: पालघरमध्ये तृतीयपंथीयाकडून तरुणाची हत्या, तपासात धक्कादायक माहिती उघड!-palghar murder transgender held on charge of killing man in sativali village ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Murder: पालघरमध्ये तृतीयपंथीयाकडून तरुणाची हत्या, तपासात धक्कादायक माहिती उघड!

Palghar Murder: पालघरमध्ये तृतीयपंथीयाकडून तरुणाची हत्या, तपासात धक्कादायक माहिती उघड!

Sep 21, 2024 03:11 PM IST

Transgender Kills Man In Palghar: पालघरच्या सातीवली गावात एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी तृतीयपंथीयाला पोलिसांनी अटक केली आहे.

 पालघरमध्ये तृतीयपंथीयाकडून तरुणाची हत्या
पालघरमध्ये तृतीयपंथीयाकडून तरुणाची हत्या

Transgender Kills Man News: मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील झाडाझुडपात गुरुवारी (१२ सप्टेंबर २०२४) दुपारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. या हत्येचे गूढ उकलण्यात एमबीव्हीव्ही पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तृतीयपंथीयाला अटक केली आहे. पैशांच्या वादातून तृतीयपंथीयाने संबंधित व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील झाडाझुडपात गुरुवारी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचण येत होती. परंतु, पोलिसांना घटनास्थळावरून एक साडी आणि काही वापरलेली गर्भनिरोधक साधने आढळून आली. या हत्येमागे एका तृतीयपंथीयाचा हात असल्याचे पोलिसांना संशय आला. यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी रुपा शेख या तृतीयपंथी संशयिताला अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली.पैशांवरून झालेल्या वादातून आरोपी तृतीयपंथीयाने संबंधित तरुणाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

अंबरनाथ: मजुरीच्या वादातून कंत्राटदाराची हत्या, कामगाराला अटक

मजुरीच्या वादातून कंत्राटदाराच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एका २३ वर्षीय कामगाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सलीम याकूब शेख याला खुनाचा गुन्हा दाखल केला. अंबरनाथ पूर्वेकडील वडवली विभागात इमारत पुनर्बांधणीचे काम सुरू असताना रविवारी (१५ सप्टेंबर २०२४) ही घटना घडली. या प्रकल्पासाठी कंत्राटदार अब्दुल रेहमान यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या गावातून दोन कामगार आणले होते. हे तिघेही बांधकामाच्या ठिकाणी एका शेडमध्ये राहत होते.

हत्येमागचे कारण काय?

आरोपींच्या जबाबानुसार, रेहमानने सुरुवातीला त्यांना दररोज एक हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांना फक्त ९०० रुपये हजेरी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु, दोन महिन्यानंतर त्यांना ७०० रुपये हजेरीने पैसे देण्याचे ठरले. यावरून वाद निर्माण झाले. कौटुंबिक समस्यांचा सामना करत असलेल्या शेख यांना पैशांची तातडीची गरज होती आणि तो वेळेची कोणतीही मर्यादा न ठेवता अतिरिक्त तास काम करत होता. रविवारी सकाळी असाच वाद झाला आणि शेख संतापला आणि त्याने रेहमानवर हातोड्याने वार केले. या हल्ल्यात अब्दुल रेहमान गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

Whats_app_banner
विभाग