Palghar : घरकुल योजनेवरून दोन सख्ख्या भावात वाद; रागाच्या भरात थोरल्यानं केली धाकट्याची हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar : घरकुल योजनेवरून दोन सख्ख्या भावात वाद; रागाच्या भरात थोरल्यानं केली धाकट्याची हत्या

Palghar : घरकुल योजनेवरून दोन सख्ख्या भावात वाद; रागाच्या भरात थोरल्यानं केली धाकट्याची हत्या

Oct 31, 2024 02:22 PM IST

Palghar Man Kills Brother: सरकारी घरकुल योजना आणि घराचे वीज बिल यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने आपल्या धाकट्या भावाची हत्या केली.

पालघर: थोरल्या भावाने केली धाकट्या भावाची हत्या
पालघर: थोरल्या भावाने केली धाकट्या भावाची हत्या

Palghar Man Kills Brother With Sickle: वीज बिल आणि सरकारी योजनेवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने धाकट्या भावाची हत्या केली. पालघर जिल्ह्यातील साकळे पाडा गावात ही घटना बुधवारी (३० ऑक्टोबर २०२४) घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

चंद्रकांत जीतू पाटील (वय, ३५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, सतीश जितू पाटील (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी घरकुल योजनेचा लाभ आणि घरातील वीज बिलावरून चंद्रकांत आणि सतीश यांच्यात नेहमीच वाद होत असे. बुधवारी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका पेटला की, रागाच्या भरात सतीने चंद्रकांतवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चंद्रकांत जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि सतीशला अटक केली. सरकारी लाभ आणि घरखर्चावरून वारंवार होत असलेल्या वादामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

विरार: लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीची हत्या

विरारमध्ये एका व्यक्तीने लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला अटक केली. धनश्री आंबेडकर (वय ३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिला विवाहित असून तिचे आरोपीसोबत विवाहबाह्य संबंध होते. धनश्रीचा पती कामावर आणि मुले शाळेत गेल्यानंतर आरोपी त्यांच्या घरी जात असे. घटनेच्या दिवशी आरोपी धनश्रीच्या घरी गेला होता. त्यानंतर दुपारी धनश्री बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शवविच्छेदनाच्या अहवालातून हत्या झाल्याचे स्पष्ट

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीकडे विचारपूस केली असता धनश्रीचे आरोपीसोबत गेल्या पाच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती त्याने दिली. सहा महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी धनश्री आणि कदमला एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही हे दोघे कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध एकमेकांना भेटायचे. धनश्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर तिचा गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानेच धनश्रीची हत्या केल्याची कबूली दिली. आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर