Palghar : पैशांसमोर रक्ताचं नातं विसरला, वहिनीसह अडीच वर्षाच्या पुतणीलाही संपवलं; पालघर येथील घटना!-palghar man held for murder of sister in law her baby girl over property dispute ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar : पैशांसमोर रक्ताचं नातं विसरला, वहिनीसह अडीच वर्षाच्या पुतणीलाही संपवलं; पालघर येथील घटना!

Palghar : पैशांसमोर रक्ताचं नातं विसरला, वहिनीसह अडीच वर्षाच्या पुतणीलाही संपवलं; पालघर येथील घटना!

Sep 04, 2024 10:50 AM IST

Palghar Man Kills Sister-in-law And Her Baby Girl: पालघरमध्ये मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने सख्ख्या भावाची पत्नी आणि पुतणीची हत्या केली.

मालमत्तेच्या वादातून वहिनीसह पुतणीलाही संपवलं!
मालमत्तेच्या वादातून वहिनीसह पुतणीलाही संपवलं!

Palghar Murder: पालघर येथील सावरे गावातील बर्डेपाडा परिसरातील नाल्यात एक महिला आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते. यावरून त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी तपासणीला सुरुवात केली असता त्यांना मयत महिलेच्या दीरावर संशय आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी दीराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुश्मिता प्रवीण डावरे (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. सुश्मिता डावरे ही आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसोबत गावाबाहेर असलेल्या शेतघरात राहत होती. तर, तिचा पती प्रवीण डावरे हा एका मच्छीमार बोटीवर बाहेरगावी कामाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुश्मिता आणि त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना सुश्मिता यांचा दीर संदीप डावरे याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मालमत्तेच्या वादातून वहिनी सुश्मिता आणि पुतणीची हत्या केल्याची कबूली दिली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संदीप डावरे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) (खून) आणि २३८ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. पैशांसमोर आरोपी रक्ताचे नाते विसरल्याने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या, मुलाला अटक

गुजरातमधल्या राजकोटमध्ये जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आईची हत्या केल्यानंतर आरोपी इन्स्टाग्रामवर आईसह स्वत:चा फोटो शेअर करत तिची माफी मागितली आहे. 'मला माफ कर आई, मी तुझी हत्या केली. तुझी नेहमीच आठवण येईल. ओम शांती' अशा आशयाची त्याने पोस्ट केली होती. ज्योतिबेन गोसांई (वय, ४८) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ज्योतिबेन आणि त्यांचा आरोपी मुलगा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत असे. या वादाला कंटाळून आरोपीने आई झोपेत असताना तिचा गळा आवळून हत्या केली.

विभाग