Palghar Crime : पालघर येथील मुरबे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमाला प्रेयसीच्या घरच्यांचा विरोध असल्याने प्रियकर आणि प्रेयसीत जोरदार भांडण झाले. या भांडणात राग अनावर झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह झाडीत फेकून देऊन फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि १०) सकाळी घडली.
स्नेहा पुरुषोत्तम चौधरी (वय वय) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सुमित तांडेल (वय २१) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. फरार सुमितला पोलिसांनी संध्याकाळी सातपाटी येथून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा चौधरी व तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे येथील राहणार आहे. हे दोघेही तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करत होते. दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांना लग्न देखील कारायचे होते. मात्र, त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता.
दोघेही सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता कामावर जायला निघाले. मात्र, रस्त्यात कुंभवली गावाजवळ त्यांच्यात लग्नावरून भांडण सुरू झाले. या भांडणादरम्यान सुमितचा राग अनावर झाल्याने त्याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून तिला गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न देखील केला. दरम्यान सुमितने स्नेहाला दवाखान्यात नेतो असे सांगून तिला दुचाकीवर बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परीसरात घेऊन गेला. येथे त्याने तिची हत्या केली. मृतदेह तेथेच टाकून तो फरार झाला.
भर रस्त्यात दोघांमध्ये भांडण झाल्याची व तिला सुमितने मारल्याची माहिती नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय व पोलिसांना दिली. बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह तातडीने खाजन परीसरात दोघांचा शोध घेतला. दुपारी २ वाजता स्नेहाचा मृतदेह खाजन परीसरात सापडला. तिच्या अंगावरील कपडे आणि बॅगेवरून तिची ओळख पातळी.
बोईसर पोलिसांनी तपास पथक स्थापन करत आरोपी सुमितला संध्याकाळी सातपाटी येथून अटक केली. स्नेहाचा मृतदेह शविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या