पालघर : पालघर येथील बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील रवीना इंडस्ट्रीजच्या पाठीमागे प्लॉट नंबर w87 मधील केमिकल कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना बोईसरमधील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या चार बंबाच्या साह्याने काल रात्री आग आटोक्यात आणण्यात आली.
फुरखान युनिस खान (वय २७, रा. हरदावली, तालुका बबेरु जिल्हा बांदा, उत्तर प्रदेश सध्या राहणार सत्तर बंगला midc बोईसर), अस्पाक नजर मोहम्मद शेख (वय ३५, रा. सत्तर बंगला बोईसर मूळ रा. दलपुतपूर तालुका जिल्हा बलरामपूर उत्तर प्रदेश), काळुदार संतराम वर्मा (वय ५०) राहणार सत्तर बंगला बोईसर अशी आगीत जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यात एक मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन टे चार किमी परिसरात बसले. यानंतर काही काळात या कंपनीत मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी आले. यावेळी एका सुरक्षा रक्षकाने ही आग स्टो पेटवल्यानं भडका उडून केमिकल टँकरला आग लागून स्पोट झाल्याचे सांगितले. स्फोटांमुळे येथील गोडाऊनला मोठी आग लागली. दरम्यान, याच वेळी वरील तिघे आगीत होरपळले. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. रात्री उशिरा आठ बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱ्यांन यश आले आहे. केमिकल टँकरला गळती झाल्यामुळं आग लागल्याची माहिती पालघरचे उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या