मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Crime : पालघर येथे चिमूकलीच्या हत्तेचे गूढ उकलले ! जन्मदात्या आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या

Palghar Crime : पालघर येथे चिमूकलीच्या हत्तेचे गूढ उकलले ! जन्मदात्या आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 20, 2022 05:01 PM IST

Palghar Crime : पालघर येथे एका लहान मुलीचा खून करून तिचा मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून तिच्या घराशेजारील कचरा कुंडीत टाकण्यात आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या मुलीचा खून तिच्या आईनेच केल्याचे उघड झाले असून आर्थिक विवंचनेतून तिने हा खून केल्याचा अंदाज आहे.

Crime News
Crime News (HT)

पालघर : पालघर येथील जव्हार येथे एका ३ वर्षीय मुलीचा मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून तिच्या घराशेजारील कचरा कुंडीत टाकण्यात आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी या हत्तेचे गूढ उकलले असून आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.

अफसाना उर्फ तारा सुलेमानी असे आरोपी आईचे नाव आहे. तर सना सुलेमानी असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अफसाना ही मागील दोन वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. तिला एकूण तीन अपत्ये आहेत. ज्यात दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. या महिलेला १४ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत तर तीन वर्षांच्या चिमुकलीची तिने हत्या केली. ती इतरांच्या घरी काम करून उदरनिर्वाह करत होती. मात्र, तरी सुद्धा तिला पैशांची चणचण भासत होती. यामुळे घरात नेहमीच पैशांवरुन वाद होत होते. यातूनच तिने तिच्या तीन वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केली. आणि तिचा मृतदेह हा प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून तो काचऱ्याच्या ढीगाऱ्यात फेकला.

तिचा मृतदेह सापडल्यावर खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला. दरम्यान सनाच्या आईवर संशय बळावला. पोलिसांनी तिला अटक केली. तिची चौकशी केली असता तिने मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. हत्येचं खरं कारण काय आहे ही अद्याप समजू शकले नाही. हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग