मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar: पतीनं फिरायला नेलं नाही म्हणून पत्नीला आला राग; पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:चंही आयुष्य संपवलं!

Palghar: पतीनं फिरायला नेलं नाही म्हणून पत्नीला आला राग; पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:चंही आयुष्य संपवलं!

Jul 09, 2024 04:50 PM IST

Palghar Dahanu Murder and Suicide: पालघरच्या दहाणू येथे एका महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली.

पालघरच्या डहाणू येथे पोटच्या मुलीची हत्या करून महिलेची आत्महत्या
पालघरच्या डहाणू येथे पोटच्या मुलीची हत्या करून महिलेची आत्महत्या

Palghar Women Kills Daughter and Suicide: पालघर येथील डहाणूमध्ये घरगुती वादातून एका महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना डहाणू परिसरातील सिसणे गावात सोमवारी (८ जुलै २०२४) घडली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपल्या कुटुंबासह कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास होते. तर, तिचा पती मच्छीमार तो सतत कुटुंबापासून दूर असायचा. गेल्या अनेक दिवसानंतर रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. आपल्याला सोबत नेले नाही म्हणून महिलेला राग अनावर झाला. तिने कशाचाही विचार न करता पोटच्या चार वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घराच्या छताला गळफास लावून स्वत:ही आत्महत्या केली.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करत माय-लेकीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. महिलेने मुलीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

पुणे: लग्नाच्या सात महिन्यानंतर पत्नीची हत्या

पुण्यातील रांजणगाव येथे एका व्यक्तीने हत्या केली. रसायनशास्त्रात पदवी धारक आणि एमबीए पदवीधर असलेल्या आरोपीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. त्यांच्या लग्नाला सात महिने झाले होते. स्वप्नील शामराव रणपिसे (वय, २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, शीतल (वय, २३) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वप्नीला शीतलच्या चारित्र्यावर संशय होता. सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना आरोपीच्या हालचालीवर संशय आला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

 

WhatsApp channel
विभाग