Palghar Boat Capsizes: पालघर बोट दुर्घटनेतील एकाचा मृतदेह सापडला, ११ जणांना वाचवण्यात यश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Boat Capsizes: पालघर बोट दुर्घटनेतील एकाचा मृतदेह सापडला, ११ जणांना वाचवण्यात यश

Palghar Boat Capsizes: पालघर बोट दुर्घटनेतील एकाचा मृतदेह सापडला, ११ जणांना वाचवण्यात यश

May 29, 2024 01:23 PM IST

Palghar Arnala Boat Capsizes: पालघरच्या अर्नाळा येथे समुद्रात बोट उलटल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

 पालघर बोट दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
पालघर बोट दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Palghar Boat Capsizes News: पालघर जिल्ह्यात बांधकाम साहित्य घेऊन जाणारी बोट समुद्राच्या मध्यभागी उलटल्याची दुर्घटना घडली. या घटनेत एका ३० वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, ११ जणांना बचावण्यात यश आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. रविवारी संध्याकाळच्या (२६ मे २०२४) सुमारास ही घटना घडली. तेव्हापासून शोध मोहिम सुरू होती. आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

वसईचे तहसीलदार अविनाश कोस्ती यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, अर्नाळा जेट्टीवरून बांधकाम साहित्य घेऊन जाणारी एक बोट रविवारी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास समुद्रात उलटली. त्यावेळी या बोटमध्ये एकूण १३ जण होते. स्थानिक मच्छिमार, पोलीस आणि बंदर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ११ जणांना वाचवण्यात यश मिळविले. मात्र, संजय मुकणे नावाची व्यक्ती बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा मृतदेह आज सकाळी आढळला.

बांधकाम साहित्य घेऊन जात असताना बोट उलटली

सोमवारी संध्याकाळी शोध मोहिमेसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे अर्नाळा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही बोट बांधकाम साहित्य घेऊन जात असताना दुसऱ्या जहाजाला धडकून ती उलटली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली.

अहमदनगर: बचावकार्यात गुंतलेली बोट उलटून ३ जवानांचा मृत्यू

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ गुरुवारी (२३ मे २०२४) सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान बोट उलटली. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला. बुधवारी (२२ मे २०२४) नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. शोध मोहिमेसाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. आकाश शिंदे, वैभव वाघ, राहुल पवार अशी मृत जवानांची नावे आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर