Pakistan broke ceasefire on LOC : पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली असून नियंत्रण रेषेवरील तारकुंडी भागातील भारताच्या फॉरवर्ड पोस्टवर गोळीबार केला. यामुळे सीमेवर तणाव निर्णयाम झाला असून भारतीय लष्कराने याला चोख उत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, याच भागात बुधवारी सायंकाळी भूसुरुंगावर पाय पडल्याने झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचा एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) किरकोळ जखमी झाला. जखमी अधिकाऱ्याला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात सीमेपलीकडून शत्रूच्या कारवाया वाढल्याने नियंत्रण रेषेवरील परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या वर्षातील शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही पहिलीच घटना असून पाच दिवसातील सीमेपलीकडील घुसखोरीची ही चौथी घटना आहे.
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात एका फॉरवर्ड पोस्टचे रक्षण करताना सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता.८ फेब्रुवारी रोजी राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
४ आणि ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कृष्णा घाटी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी भूसुरुंग स्फोट केला होता. काही दशतवादी हे भारतीय सीमेत घुसण्याच्या तयारीत होते. जम्मूस्थित व्हाईट नाईट कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी १० फेब्रुवारी रोजी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेची पाहणी केली. भारतीय लष्कराने सांगितले की, जीओसी व्हाईट नाईट कॉर्प्स, जीओसी ऑफ स्पेड्स आणि जीओसी क्रॉस्ड स्वॉर्ड डिव्हिजनयांनी राजौरी सेक्टरच्या फॉरवर्ड एरियाला भेट देऊन सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि पाकिस्तानी कारवायांची माहिती घेतली. " सध्या पाकिस्तान सीमेवर परिस्थिती नियंत्रणात आहे. पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं लष्कराने स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या