बोधेगावच्या बेपत्ता पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकर्‍याची निर्घृण हत्या! मुंडकं मंदिराशेजारी तर धड आढळलं विहिरीत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बोधेगावच्या बेपत्ता पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकर्‍याची निर्घृण हत्या! मुंडकं मंदिराशेजारी तर धड आढळलं विहिरीत

बोधेगावच्या बेपत्ता पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकर्‍याची निर्घृण हत्या! मुंडकं मंदिराशेजारी तर धड आढळलं विहिरीत

Feb 04, 2025 08:40 AM IST

Pahilwan Baba Mandir Bodhegaon Murder : अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील बाबा पहिलवान मंदिराचे सेवेकरी हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यांची हत्या झाल्याचे उघड झालं आहे.

बोधेगावच्या बेपत्ता पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकर्‍याची निर्घृण हत्या! मुंडकं मंदिराशेजारी तर धड आढळलं विहिरीत
बोधेगावच्या बेपत्ता पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकर्‍याची निर्घृण हत्या! मुंडकं मंदिराशेजारी तर धड आढळलं विहिरीत

Pahilwan Baba Mandir Bodhegaon Murder : शिर्डी देवस्थान संस्थेच्या दोघांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना आता शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील एका सेवेकऱ्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. हे सेवेकरी गेल्या आठवड्या भरापासून बेपत्ता होते. अखेर त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांचं मुंडंक हे मंदीरा शेजारी तर धड जवळील विहिरीत सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवर पहिलवान बाबा मंदिर आहे. येथे गेल्या १५ वर्षांपासून सेवेकेरी म्हणून काम करणारे नामदेव दहातोंडे (वय ७०) यांची हत्या करण्यात आली आहे. नामदेव दहातोंडे हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या मृतदेह हा सोमवारी मंदिराशेजाच्या विहिरीत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांची हत्या नेमकी का करण्यात आली ? या बाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

गावात उडाली खळबळ

नामदेव दहातोंडे हे बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरात सेवेकरी होते. ते गेल्या पंधरा वर्षांपासून मंदिरात साफसफाई व देखभालीचे काम करत होते. ते गेल्या २६ जानेवारी पासून बेपत्ता होते. या प्रकारणी मंदिराचे पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिस त्यांचा शोध घेत असतांना मंदिराशेजारी सडलेल्या मृतदेहाचा वास येत होता. त्यामुळे ही बाब पोलिसांना सांगण्यात आली. पोलिसांनी परिसराचा शोध घेतला असता, ट्या ठिकाणी दहातोंडे यांचे धड नसलेले मुंडके सापडले. यानंतर पोलिसांनी या परिसरात कसून तपासणी केली. त्यावेळी मंदिरापासून काही अंतरावरील एका विहिरीतून देखील वास येत असल्याने त्यांनी या विहीरीची तपासणी केली. यावेळी विहिरीत त्यांचे धड सापडले. या विहिरीत त्यांचे धड अर्धवट पुरलेल्या अवस्थेत होते.

त्यांची हत्या नेमकी का करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना मिळालेलं नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ही हत्या का केली असावी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर