Padma Awardees from Maharashtra List : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. यंदासात जणांना पद्मविभूषण पुरस्कार, १९ जणांना पद्मविभूषणआणि ११३ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या १४ जणांना पद्म पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ३ पद्मभूषण तर ११ जणांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे.
आज जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. कलाक्षेत्रासाठी महाराष्ट्रातून अशोक सराफ यांच्यासोबतच अच्युत पालव, आश्विनी भिडे - देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
1.मनोहर जोशी (मरणोत्तर)
2.पंकज उधास (मरणोत्तर)
3.शेखर कपूर
मारुती चितमपल्ली – साहित्य
विलास डांगरे – वैद्यकीय
अशोक सराफ – कला
अच्युत पालव - कला
अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
अश्विनी भिडे देशपांडे – कला
चैतराम पवार – सामाजिक कार्य
जसपिंदर नरुला – कला
रानेंद्र भानू मुजुमदार – कला
सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी
वासुदेव कामत – कला
मारुती चितमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापुरात झाला. त्यांनी ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा करताना तसेच निवृत्तीनंतर ६५ वर्षे जंगलात भटकंती करत वने, वन्यजीव व्यवस्थापन, वन्यप्राणी व पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले आहे. मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या व्यक्तीने एक लाख नवीन शब्दाचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी मराठीबरोबर संस्कृतचे अध्ययन केले असून जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला आहे. २००६ साली सोलापुरात भरलेल्या ७९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान चितमपल्ली यांना मिळाला होता.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह अशी डॉ. डांगरे यांची विदर्भात ओळख आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरं केलं आहे. कमी दरात गोरगरीबांची सेवा त्यांनी करत सामाजिक बांधिळकी जपली आहे.
संबंधित बातम्या