मराठी बातम्या  /  Maharashtra  /  P Chidambaram On Rs 2000 Note Withdrawal

2000 Note: नोट चलनात आणून ती परत घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा: माजी केंद्रीय अर्थमंत्र्याचा घणाघात

Congress leader P Chidambaram addresses a press conference at Tilak Bhavan, Dadar, in Mumbai on Monday.
Congress leader P Chidambaram addresses a press conference at Tilak Bhavan, Dadar, in Mumbai on Monday. (Sandeep Mahankal)
Haaris Rahim Shaikh • HT Marathi
May 29, 2023 07:36 PM IST

P Chidambaram on Indian Economy: दोन हजाराची नोट चलनात आणून ती परत घेणे हा भयंकर तमाशा आहे. या घटनेमुळं भारतातील चलनाच्या स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली.

देशात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग अत्यंत कमी झाला आहे. बेरोजगारी आणि महागाईमध्ये सतत वाढ होतय. अशा परिस्थितीत दोन हजाराची नोट चलनात आणून ती परत घेणे हा भयंकर तमाशा आहे. या घटनेमुळं भारतातील चलनाच्या स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली. दोन हजार रुपयांच्या नोटा या सामान्य जनतेसाठी गरजेच्या नव्हत्याच. नोटा चलनात आणून पुन्हा काढून टाकण्याचा निर्णय हा मूर्खपणाचा आहे, असं चिदंबरम म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं.

ट्रेंडिंग न्यूज

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका चिदंबरम यांनी केली. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये सर्वांचा विकास करणारी अशी सरकारची धोरणे असायला हवीत. परंतु गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही. सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही करत नाही हे अत्यंत वाईट आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.

मोदींच्या काळात लोकशाहीचा वटवृक्ष झाला पोकळ

देशाचा कारभार संविधानानुसार चालतोय की नाही अशी आज चिंता वाटत आहे. खोट्या केसेस, तपासाच्या धमक्या देऊन राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारांदरम्यान दरी वाढत चालली आहे, ही एक चिंतेची बाब आहे. बिगर भाजपशासित राज्यांचे राज्यपाल एखाद्या व्हाईसरॉयसारखे वागत आहेत. संसदीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचा हा वटवृक्ष पोकळ झाला असल्याची टीका चिदंबरम यांनी केली.

मणिपूर जळतोय.. मोदींचे मात्र मौन…

संरक्षण व परराष्ट्र धोरणांवरही केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याची टीका चिदंबरम यांनी केली. चिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील भूभागात अतिक्रमण केले आहे आणि आजही ते व्यापलेले आहे, याचे भरपूर पुरावे आहेत. चीन सीमाभागात संरक्षण पायाभूत सुविधा वाढवत आहे तसेच सीमेवर नवीन वसाहती उभारत आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकींपासून भारतीय गस्त घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाकिस्तान, चीन, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी देशांशी आपले संबंध चांगले राहिले नाहीत. चीन-पाकिस्तानची युती मजबूत झाली आहे आणि सुरक्षेचा धोका पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील सीमेच्या प्रत्येक भागात पसरला आहे. असे असतानाही संसदेला अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक असून ७५ हून अधिक मृत्यू झाले आहे. मणिपूर जळत असताना पंतप्रधान व गृहमंत्री कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात व्यस्त होते. मणिपूरबाबत पंतप्रधानांचे सततचे मौन गंभीर असल्याचं चिदंबरम म्हणाले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या