मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये, पब, बार मालकासह आणखी तिघांना अटक

Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये, पब, बार मालकासह आणखी तिघांना अटक

May 21, 2024 11:52 AM IST

Pune Porsche accident: वडिलांच्या पोर्श कारने दोघा तरुणांना धडक देऊन ठार मारणाऱ्या १७ वर्षीय मुलाला दारू पाजणाऱ्या पुण्यातील बारच्या मालक आणि मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे.

वडिलांच्या पोर्श कारने दोघा तरुणांना धडक देऊन ठार मारणाऱ्या १७ वर्षीय मुलाला दारू पाजणाऱ्या पुण्यातील बारच्या मालक आणि मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे.
वडिलांच्या पोर्श कारने दोघा तरुणांना धडक देऊन ठार मारणाऱ्या १७ वर्षीय मुलाला दारू पाजणाऱ्या पुण्यातील बारच्या मालक आणि मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Porsche accident update : पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर विशाल अग्रवाल हे फरार झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना आज सकाळी संभाजीनगर येथून अटक केली आहे. तर बार मालक आणि पब मालकाला देखील या प्रकरणी अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

पुणे पोलिसांनी आज विशाल अग्रवाल यांना अटक केल्यानंतर आणखी दोघांना अटक केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मँनेजर्सना पुणे पोलिसांनी आज अटक केली आहे. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर तसेक संदीप सांगळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपींविरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या अपघातात अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा हे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले.

Pune Metro : मेट्रोने आणली भन्नाट योजना! केवळ शंभर रुपयांत करा पुणे दर्शन! असा घ्या लाभ

पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, अपघाताच्या रात्री शहर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला दारू देणारे बार मालक आणि बार मॅनेजरला अटक केली आहे. मंगळवारी सकाळी अल्पवयीन चालकाच्या वडिलांना संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. मुलाच्या वडिलांना ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात येत आहे.

अमितेश कुमार यांनी एचटी मराठीला सांगितले की, अल्पवयीन ड्रायव्हरचे वडील गुन्हा दाखल झाल्यापासून अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे ते फरार होते. दोन रेस्टॉरंट परवानाधारक आणि आणखी एका व्यक्तीला काल रात्री अटक करण्यात आली. मुलाचे वडील आणि दोन रेस्टॉरंटच्या मालकांसह इतर चौघांवर मोटार वाहन कायदा (एमव्हीए) आणि किशोर न्याय कायद्याच्या (जेजेए) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Car accident: पप्पांनीच मला गाडी दिली, मी दारूही पितो! पोरशे कार अपघातातील आरोपी मुलांची धक्कादायक कबुली

अल्पवयीन मुलाला विनापरवाना महागडी कार चालवण्याची परवानगी दिल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने मार्च महिन्यात आपल्या मुलासाठी पोर्श कार खरेदी केली होती, परंतु गाडीची नोंदणी झाली नव्हती. आरोपी अल्पवयीन मुलगा एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याच्या १८ व्या वाढदिवसाला अवघे चार महिने शिल्लक आहेत.

अपघात झाल्यावर आरोपी मुलाला अटक करण्यात आली होती. ही अटके झाल्यावर काही तासांतच किशोर न्याय मंडळाने आरोपीची जामिनावर सुटका केली. त्याला अपघातावर ३०० शब्दाचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. तसेच मद्यपान सोडून पुणे वाहतूक पोलिसांकडे स्वेच्छेने काम करण्याचे देसखील आदेश दिले होते. जामीनासाठी घालण्यात आलेल्या या अटींची चर्चा देखील शहरात होती. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा आहे, असे पुणे पोलिस आयुक्तांनी सोमवारी स्पष्ट केले.

हा गुन्हा गंभीर असल्याने अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवून त्याला निरीक्षणगृहात पाठवण्याची परवानगी मिळावी, यासाठी आम्ही रविवारीच किशोर न्याय न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. आता हीच याचिका घेऊन आम्ही सत्र न्यायालयात अपील करणार आहोत असे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग