सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती; ५ लाख घरांची होणार निर्मिती!-own house dream come true for mumbaikars 5 lakh houses will build ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती; ५ लाख घरांची होणार निर्मिती!

सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती; ५ लाख घरांची होणार निर्मिती!

Feb 21, 2024 08:35 PM IST

House For Mumbai People : राज्य शासनाने घेतलेल्या स्वयंपुनर्विकासाच्या निर्णयामुळे किमान२५ हजार वसाहती म्हणजेच साधारणपणे५लाख घरांची निर्मिती होणार आहे.

House For Mumbai People
House For Mumbai People

वर्षानुवर्षे घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार आहे. राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर त्यांच्याकडे धावत येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गृहनिर्माण सहकार परिषदेतील स्वयंपुनर्विकास/पुनर्विकासाच्या निर्णयाबाबत अभ्युदयनगर येथे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. 

फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या स्वयंपुनर्विकासाच्या निर्णयामुळे किमान २५ हजार वसाहती म्हणजेच साधारणपणे ५ लाख घरांची निर्मिती होणार आहे. तीन पिढ्यांपासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बीडीडी चाळींचा बिल्डरांकडून नव्हे तर म्हाडाकडून विकास करण्याचा निर्णय घेतला. १०० स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्यांना ५६० स्क्वेअर फुटांचे घर दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्युदयनगरच्या सीएनडीच्या विकासाचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्या, प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान १७ पोलीस वसाहती म्हाडाकडून विकसित केल्या जाणार असून बांद्रा रिक्लमेशन, आदर्शनगर वरळी, पीएमजीपी कॉलनी पुनमनगर, अंधेरीतील वसाहतींच्या विकासाचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विभाग