Mumbai Bomb Therat : मुंबईला बॉम्ब हल्ल्याची धमकी नवी नाही. मात्र, आता एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालये, महाविद्यालये तसेच मुंबई महापालिकेचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. या बाबत मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये धमकीचे ईमेल आले आहेत. ईमेल पाठवणाऱ्याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडवण्याची धमकी दिली आहे. दरम्यान आदल्या दिवशी, चेन्नई, पाटणा आणि जयपूरसह ४१ विमानतळांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांना आपत्कालीन उपाययोजना कराव्या लागल्या व अनेक ठिकाणे तपासावी करावी लागली.
जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटल्सना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. धमकीचे ईमेल व्हीपीएन नेटवर्क वापरून पाठवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले की, धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख व धमकीचा उद्देश अद्याप समजू शकलेला नाही.
एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबईतील हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सला देखील बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेलही मिळाला आहे. "स्थानिक पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले व तपास सुरू केला, परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. मुंबईचे व्हीपी रोड पोलिस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे," एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.
आदल्या दिवशी, चेन्नई, पाटणा आणि जयपूरसह ४१ विमानतळांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. त्यांना आपत्कालीन उपाययोजना कराव्या लागल्या व अनेक ठिकाणे तपासावी लागली. ही तपासणी व शोधमोहीम तासनतास चालली. तपासानंतर या धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. विमानतळांना मिळालेल्या ईमेलमध्ये जवळजवळ एकसारखे संदेश होते: "हॅलो, विमानतळावर स्फोटके लपवून ठेवली आहेत. लवकरच बॉम्बचा स्फोट होईल. तुम्ही सर्व मराल." असे पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये लिहिलेले होते.
सुरक्षा यंत्रणांच्या अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर या धमक्या फसव्या असल्याचे घोषित करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळांवर दुपारी १२.४० च्या सुमारास 'xhumdu888' नावाच्या ई-मेल आयडीवरून हे ई-मेल मिळाले होते झाले. वाराणसी, चेन्नई, पाटणा, नागपूर, जयपूर, वडोदरा, कोईम्बतूर आणि जबलपूर विमानतळांना धमक्या मिळाल्या होत्या.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पहिल्यांदाच त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये होते. सूत्रांनी सांगितले की, 'केएनआर' नावाच्या ऑनलाइन ग्रुपचा या बनावट धमकीच्या ई-मेल्समागे हात असल्याचा संशय आहे. ते म्हणाले की या गटाने १ मे रोजी दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देऊ असे धमकीचे ई-मेल पाठवले होते.
विमानतळांना मिळालेल्या ई-मेलमध्ये जवळजवळ एकसारखे संदेश होते, "हॅलो, विमानतळावर स्फोटके लपवून ठेवण्यात आली आहेत. लवकरच बॉम्बचा स्फोट होईल. तुम्ही सर्व मराल." सूत्रांनी सांगितले की, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमानतळांनी तातडीच्या उपाययोजना सुरू करत तपास सुरू केला. सर्व टर्मिनलचा देखील शोधघेण्यात आला. या सोबतच काल मुंबईत देखील ५० दवाखान्यात विद्यालयात धमकी मिळाल्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली, परंतु त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. सापडले नाही.
सोमवारी आणि मंगळवारी एकाच मेल आयडीवरून हे ईमेल आल्याचे त्यांनी सांगितले. "मंगळवारला मिळालेले ईमेल सोमवारी मिळालेल्या ईमेलसारखेच होते, ज्यात शहरातील प्रमुख खाजगी, सरकारी आणि महानगरपालिका संचालित रुग्णालये आणि महाविद्यालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या होत्या.
मुंबई पोलिसांनी या प्रकारचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात धमकीचे मेल आल्याने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर बॉम्ब हल्याची धमकी देण्यात आली आहे. बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटच्या साह्याने या धमक्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान, धमकीचा ईमेल पाठवण्यामागचा हेतू काय होता, याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
मुंबईतील रुग्णालयांसोबतच हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये धमकीचा ईमेल आला आहे. ईमेल करणाऱ्याने कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. तर बीएमसी मुख्यालयाला धमकीचा ईमेल आला आहे. पोलिसांनी बीएमसीच्या मुख्यालयात तपास केला पण त्यांना काहीही आढळले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या