beed maratha protest : बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून एसटी बस पेटवली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  beed maratha protest : बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून एसटी बस पेटवली

beed maratha protest : बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून एसटी बस पेटवली

Sep 13, 2024 10:00 AM IST

Beed Maratha Protest: बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी गुरुवारी रात्री बस पेटवली. चालक आणि मेकॅनिकने दाखवलेल्या प्रसंगावधान मोठी दुर्घटना टळली.

बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून एसटी बस पेटवली
बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून एसटी बस पेटवली

Beed Maratha Protest: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे १७ तारखेपासून उपोषण सुरू करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बीडमध्ये मराठा आंदोलक हिंसक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री काही मराठा आंदोलकांनी एसटीबस पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बसमधून चालक व मेकॅनिकला बाहेर काढत गाडीत पेट्रोल ओतले व आग लावली. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसमधील चार सीट्स जळून खाक झाल्या आहेत.

राज्यात मराठा आंदोलन पुन्हा पेटणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक होणार आहे. याची प्रचिती गुरुवारी बीडमध्ये आली. बीडमध्ये तिघांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत एसटी रोखून चालक व मेकॅनिकला बाहेर काढत गाडीत पेट्रोल टाकून आग लावली. ही घटना बीडच्या घोडका राजुरीजवळ घडली.

काय आहे घटना ?

बीडच्या घोडका राजुरीजवळ काही अज्ञात लोकांनी एसटीबस कारमध्ये लावून अडवली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा दिल्या. एसटी बसमधून चालक आणि मेकॅनिकला त्यांनी खाली उतरवलं व बसमध्ये पेट्रोल ओतले. व आंदोलकांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजी करत आग लावली. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले. गाडीतील चार सीट व केबिन जाळून खाक झाले. दरम्यान, आंदोलक बाहेर गेल्यावर चालक व मेकॅनिकनं यांनी तातडीने आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

ही एसटीबस हिवरापहाडी येथे मुक्कामी आली होती. मात्र, या गाडीत बिघाड झाल्याने मेकॅनिक उत्तम राऊत व राम कुलथे हे ही बस दुरुस्तीसाठी घेऊन निघाले होते. त्यामुळे गाडीत प्रवासी नव्हते. दरम्यान, ही गाडी बीड परळी रोडवर घोडका राजुरी येथे आली असता एक कार बससमोर आली. त्यांनी मध्येच गाडी येऊन थांबली व गाडीतील तिघांनी कारमधून पेट्रोलची बाटली काढून बसमधील सीटवर पेट्रोल ओतले तर दुसऱ्याने माचिसच्या कडीने बस पेटवली. यावेळी चालकाने बाजूला सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणावरून पाणी आणून आग नियंत्रणात आणली. या प्रकरणी अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर