मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग! निर्माता, दिग्दर्शकावर गुन्हा

ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग! निर्माता, दिग्दर्शकावर गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 13, 2024 11:47 AM IST

OTT producer director booked for molesting actress : मुंबईत ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी निर्माता अनाई दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

OTT producer director booked for molesting actress
OTT producer director booked for molesting actress (HT_PRINT)

OTT producer director booked for molesting actress : मड बेटावर एका बंगल्यात ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, एका २१ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग केल्या प्रकरणी दिग्दर्शक आणि निर्मात्याविरुद्ध गुणा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने मालवणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आजच भाजप प्रवेश! प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील एका अभिनेत्रीने जानेवारी महिन्यात मढ आयलंडच्या बंगल्यात वेब सीरिजसाठी ऑडिशन दिले होते. ही वेबसिरिज साइन केल्यावर, बंगल्यात दोन दिवसांचे शूटिंग सुरू झाले. शूटिंग सत्रादरम्यान, वेबसिरिजचा निर्माता आणि दिग्दर्शक पुनित गोयल याने अभिनेत्रीची छेड काढत तिचा विनयभंग केला. यावर तिने आक्षेप घेतला, तेव्हा गोयल यांनी ही घटना कोणाला सांगितल्यास तिचे करियर खराब होईल अशी धमकी दिली. अभिनेत्रीने शूटिंग अर्धवट सोडून थेट मालवणी पोलिसांकडे धाव घेत लेखी तक्रार दिली.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर आणि साक्षीदार तपासल्यावर पोलिसांनी गोयल यांच्या विरोधात विनयभंग आणि तक्रारदाराला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. मालवणी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गोयल यांच्यावरील आरोपांमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (महिलेचा अपमानजनक विनयशीलता) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) यांचा समावेश आहे.

WhatsApp channel