मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  INLD च्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले.. शरद पवार, नितीश कुमारांसह बड्या नेत्यांनी फुंकले २०२४ चे रणशिंग

INLD च्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले.. शरद पवार, नितीश कुमारांसह बड्या नेत्यांनी फुंकले २०२४ चे रणशिंग

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 25, 2022 06:36 PM IST

भारतीय राष्ट्रीय लोकदल (INLD)कडूनहरियाणाराज्यातील फतेहाबाद येथेरविवारीविरोधी पक्षांचीएक शंखनाद रॅली पार पडली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार, बिहारचे मुख्यमंत्रीनितीश कुमार, माकपा नेतेसीताराम येचुरीआणि शिरोमणी अकाली दलाचेअध्यक्ष सुखबीर सिंह बादलयांच्यासग अनेक नेते सामील झाले होते.

विरोधी पक्षांची रॅली
विरोधी पक्षांची रॅली

भारतीय राष्ट्रीय लोकदल (INLD) कडून हरियाणाराज्यातील फतेहाबाद येथे रविवारी विरोधी पक्षांची एक शंखनाद रॅली पार पडली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माकपा नेते सीताराम येचुरी आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यासह अनेक नेते सामील झाले होते. विरोधी पक्षांच्या या रॅलीला यामुळे महत्वपूर्ण मानले जात आहे की, बिहारमध्ये एनडीएमधून वेगळे झाल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या व्यासपीठावर दिसले आहेत.

आज देशाचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या१०९व्या जयंतीनिमित्त हरियाणामध्ये अनेक विरोधी पक्षनेत्यांची रॅली पार पडली.

शरद पवारांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला -

शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलन केले होते. मात्र सरकारने खूप दिवस शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. सरकारने शेतकऱ्यां विरोधीतील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले, मात्र ते पूर्ण केले नाही. सर्वांसाठी २०२४ मध्ये सत्ता परिवर्तनाच्या दिशेने काम करण्याची वेळ आली आहे. शेतकरी व तरुणांचे आत्महत्या करणे समस्येचे निराकरण नाही. मात्र या रॅलीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत की, अखेर नितीश कुमार आणि शरद पवार विरोधकांची एकजून कायम ठेवतील की, यामध्ये मध्येच फूट पडेल.

यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ओम प्रकाश चौटाला यांना फसवून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांनीच आम्हाला भाजप सोडण्यास सांगितले, आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले. गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराचा पराभव करण्यात त्यांचा सहभाग होता. मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, भाजप आश्वासन दिल्याप्रमाणे काम करत नव्हते. बिहारमध्ये ७ पक्ष एकत्र आले आहेत. २०२४ मध्ये भाजप जिंकू शकत नाही.

तेजस्वी यादव यांनीही आपल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला. तेजस्वी यादव म्हणाले की, ''आजचा दिवस सन्मान दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज आपण खुर्चीवर बसलो आहोत, यामध्ये चौधरी देवी लाल यांचे मोठे योगदान आहे. आमच्या वडिलांची तब्येत ठीक नाही, अन्यथा तेही या कार्यक्रमत उपस्थित असते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या