मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Water stock in Mumbai Dams : मुंबईत पाणी-बाणी! धरणांत केवळ ३२ टक्के साठा; केवळ दोन महिने होणार पुरवठा

Water stock in Mumbai Dams : मुंबईत पाणी-बाणी! धरणांत केवळ ३२ टक्के साठा; केवळ दोन महिने होणार पुरवठा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 26, 2024 07:43 AM IST

Water stock in Mumbai Dams : राज्यात (mumbai water issue) उन्हाच्या झळा वाढत असतांना दुसरीकडे आता धरणातील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होऊ लागला आहे. आर्थिक राजधानी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ३२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

आर्थिक राजधानी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ३२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.
आर्थिक राजधानी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ३२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

Water stock in Mumbai Dams : राज्यात सध्या उन्हाळा वाढू लागला आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे जिवाची लाही लाही होत आहे. असे असतांना राज्यातील धरणातील पाणीसाठा हा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. आर्थिक राजधानी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धारणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धारणांमध्ये केवळ ३२. ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता आतापर्यन्तचा हा सर्वाधिक कमी आकडा असून मुंबईकरांवर पाणी कपातीचे गहिरे संकट डोक्यावर आहे. जूनमध्ये जर पाऊस झाला नाही, तर जुलैपर्यंत पाणी पुरवायचे कसे असे आव्हान महापालिकेसमोर आहे.

Karnataka News : सट्टेबाजीचा नाद नडला! क्रिकेट बेटीगमध्ये इंजिनिअर हरला दीड कोटी; पत्नीनं केली आत्महत्या

मुंबईला प्रामुख्याने उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून पानी पुरवठा केला जातो. सध्या या धरणात केवळ ४ लाख ६७ हजार ७६६ दशलक्ष लिटर म्हणजे ३२.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. मुंबईला रोज ३,८०० दशलक्ष लिटर पानी पुरवठा केला जातो. त्यामुळे आता धरणात असलेले पानी हे केवळ दोन महीने पुरणार आहे. महिन्याला सुमारे १२ ते १३ टक्के पाण्याचा पुरवठा मुंबईला केला जातो. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून यामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे जर पाऊस झाला नाही तर जुलैपर्यंत हे पाणी पुरवणार कसे असे आवाहन पालिकेपूढे आहे.

Railway mega block : रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट

सध्या धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता मुंबईवर १० टक्के कपाटीचे संकट गहिरे होणार आहे. धरणात पाणी साठा ५० टक्क्यांवर आल्यानंतर भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर तर वैतरणा धरणातून ९२.५ दशलक्ष लिटर पानी राखीव ठेवण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. यामुळे १० टक्के पाणीकपात करण्याचे नियोजन मागे घेण्यात आले होते.

हजारो लिटर पाण्याची नासाडी

मुंबईत मोठया जल्लोषात धुळवड साजरी करण्यात आली झाली. रंगांबरोबरच पाण्याचाही मोठा वापर मुंबईकरांनी केला. यामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली.

मुंबईलापाणी पुरवठा करणाऱ्या धरणात आज ४,६७,७६६ दशलक्ष लिटर पाणी म्हणजेच ३२.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा साठा ५,६३,१८१ दशलक्ष लिटर म्हणजेच ३८.९१ टक्के एवढा होता. तर २५ मार्च २२ रोजी ६,०६,७४१ दशलक्ष लिटर पाणीसाठा ४१.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

IPL_Entry_Point