सध्या ऑनलाईन शॉपिंगचा फॅड चांगलंच वाढलं असून श़पिंग साईटची संख्याही वाढली आहे. अनेकदा लोक मोठ्या डिस्काऊंटच्या आमिषाला भुलून ऑनलाईन शॉपिंग करतात आणि बनावट साईटच्या जाळ्यात अडकून आपली फसवणूक करून घेत असतात. अशीच एक घटना वर्ध्यात समोर आली आहे. येथे एका महिलेची १ लाखांची फसवणूक झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील म्हसाळा येथे राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांना १ लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. राखीयांनी एका ऑनलाईन साइटवरून ९९७ रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र, तो ड्रेस त्यांना आवडला नसल्याने त्यांनी तो परत केला व पैसे रिफंड मागितले. रिफंड न आल्याने त्यांनीकस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला.
महिलेने कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यास सांगितले व त्यांची संपूर्ण बँक डिटेल घेण्यात आली. वेबसाईटने त्यांच्याव्हॉट्सॲप क्रमाकावर एकएपीके फाइल पाठवली. ती फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यातून आणि ८५ हजार व नंतर १५ हजार असे एकूण तब्बल १ लाख रुपये गायब झाले. महिलेने याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वेबसाईटने सांगितल्यानुसार महिलेने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क केला. त्यानंतर त्यांच्याकडून गुगल पे,फोन पे क्रमांक, तसेच पिनकोड क्रमांक मागितला गेला. महिलेने सर्व डिटेल दिले असता त्यांच्या व्हॉट्सॲपवर एपीके फाइल पाठवून डाउनलोड करण्यास सांगितले. फाइल डाउनलोड करताच महिलेच्या बँक खात्यातून १ लाख रुपये उडवण्यात आले. त्यानंतर महिलेले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी पोलीस ठाणे गाठले.
शॉपिंग साईटवर वर्षभर कोणत्या तरी सणाच्या निमित्ताने आकर्षक योजना असतात. ब्रॅण्डेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांना भूरळ पडतेआणि त्यांना मोठा फटका बसला. ग्राहकांनी ऑनलाईन शॉपिंग करताना सावधानता बागळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.