Online Fraud: ३२ हजार रुपयांचे घड्याळ ऑनलाइन मागवले, पण 'अशी' झाली फसवणूक, ग्राहकाची ट्विटरवर पोस्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Online Fraud: ३२ हजार रुपयांचे घड्याळ ऑनलाइन मागवले, पण 'अशी' झाली फसवणूक, ग्राहकाची ट्विटरवर पोस्ट

Online Fraud: ३२ हजार रुपयांचे घड्याळ ऑनलाइन मागवले, पण 'अशी' झाली फसवणूक, ग्राहकाची ट्विटरवर पोस्ट

Aug 15, 2024 01:04 PM IST

Online Shopping Fraud: ऑनलाइन घड्याळ ऑर्डर केलेल्या ग्राहकाची कशी फसवणूक झाली, हे जाणून घेऊयात.

ऑनलाइन घड्याळ ऑर्डर केलेल्या ग्राहकाची फसवणूक
ऑनलाइन घड्याळ ऑर्डर केलेल्या ग्राहकाची फसवणूक

Online Shopping Fraud News: ऑनलाइन घड्याळ ऑर्डर करणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. ग्राहकांने त्याला जुने घड्याळ मिळाल्याचा दावा केला आहे. ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून लोकांना या घटनेची माहिती दिली. संबंधित ग्राहकाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून यावर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

@Disciplined_Inv या नावाच्या एक्स प्लॅटफॉर्मवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, मी २१ जुलै २०२४ रोजी २०२४ टिसॉट पीआरएक्स घड्याळ ऑर्डर केले. मला हे घड्याळ २८ जुलै २०२४ रोजी मिळाले. मी टिसॉटच्या वेबसाइटवर गेलो आणि घड्याळाची सत्यता तपासण्यासाठी त्याचा अनुक्रमांक प्रविष्ट केला. त्यानंतर मी ऑर्डर केलेले घड्याळाची १५ फेब्रुवारी २०२३ रोजी विक्री झाल्याची माहिती मिळाली. हे घड्याळ याआधीही वापरण्यात आल्याचे मला समजल्यानंतर मी याबाबत तक्रार केली. यानंतर त्यांनी विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पुढे ग्राहकाने म्हटले आहे की, त्यानंतर कंपनीने घड्याळ बदलण्याची प्रक्रिया सुरु केली. यानंतर मला बदलून आलेले घड्याळ टिसॉट बॉक्समध्ये होते आणि त्यात अरमानी कंपनीचे घड्याळ होते.

ग्राहकाने ६ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार केली होती. ८ ऑगस्टपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ग्राहकाने ८ ऑगस्ट रोजी पुन्हा संपर्क साधला असता चौकशीसाठी आणखी एक तक्रार द्यावी लागेल आणि १२ ऑगस्टपर्यंत समस्या दूर होईल, असे सांगण्यात आले. ग्राहकाने १२ ऑगस्टला पुन्हा कॉल केला, तो ४५ मिनिटे कॉलवर राहिलो, पण त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांनी ग्राहकाला पुन्हा २४ तास थांबायला सांगितले.

 

यानंतर १३ ऑगस्ट रोजी पुन्हा काही तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकाच्या समस्येवर तोडगा काढण्यात अडचण येत असल्याची माहिती दिली. त्यांनी पुन्हा ग्राहकांकडे ४८ तासांचा वेळ मागितला आहे. ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी माझ्या काकांचा वाढदिवस आहे, मी त्यांना हे घड्याळ गिफ्ट करण्यासाठी ऑर्डर केले होते, पण आता मला फक्त मानसिक ताण सहन करावा लागत आहे. या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक या फसवणूकीबद्दल संताप व्यक्त करत आहेत. कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दिली पाहिजे, असे एका युजरने म्हटले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर