एक महिन्याच्या चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात टाकून पालक पसार; मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमधील घटना-onemonth old female child found in mumbai devagiri express toilet ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एक महिन्याच्या चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात टाकून पालक पसार; मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमधील घटना

एक महिन्याच्या चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात टाकून पालक पसार; मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमधील घटना

Sep 09, 2024 02:23 PM IST

One-month old female child Found in Train Toilet: मुंबई-देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात एक महिन्याची चिमुकली आढळल्याने प्रवाशांमध्ये एक खळबळ माजली आहे.

एक महिन्याच्या चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात टाकून पालक पसार
एक महिन्याच्या चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात टाकून पालक पसार

Mumbai-Devagiri Express News: एक महिन्याच्या चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात टाकून पालक पसार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. मुंबई- देवगिरी एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली. मात्र, या घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह प्रवाशांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडकडून मुंबईकडे येत असलेल्या देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर प्रवशांना शौचालयातून तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यानंतर प्रवाशांनी शौचलायात जाऊन पाहिले असता त्यांना मोठा धक्का बसला. शौचालयात कमोडच्या शेजारी ओढणीवर बाळ ठेवल्याचे त्यांना दिसले. याबाबत प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. नंतर मनमाड रेल्वे स्थानकावर बाळाला उतरवण्यात आले. बाळाला नाशिक येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचे समजत आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

यवतमाळ: नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून कचऱ्यात फेकले

काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात मोगर्दा गावामध्ये जन्मलेल्या नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून कचऱ्यात फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकील आला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून बाळाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आल्याचे पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

यवतमाळ: जन्मदात्या आईने रस्त्यावर फेकले नवजात अर्भक

या वर्षाच्या सुरुवातीला यवतमाळ येथील आर्णी तालुक्यातील म्हसोला येथे एका महिलेने पोटच्या बाळाला म्हसोला ते पांगरी रस्त्यावर फेकून ती पसार झाली. रस्त्यांनी जाणाऱ्या लोकांनी हे बाळ दिसून आले. यानंतर नवजात बालकाला गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.आरोग्य केंद्रातून आर्णी येथील ग्रामीण रूण्गालयात त्या नवजात बालकाला हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी बाळाची तपासणी केली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली.

मुल आणि मुलींमधील भेदभाव मिटवण्यासाठी शासनातर्फे बेटी बचाओ बेटी पढाव ही मोहीम राबवली जात आहे. समाजात मुली बाबत असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहे. मात्र, अजूनही काही लोक मुले आणि मुलींमधील भेदभाव करताना दिसत आहेत.

Whats_app_banner
विभाग