मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tarkarli Beach Kokan : तारकर्ली किनाऱ्यावर तीन पर्यटक बुडाले, एका मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Tarkarli Beach Kokan : तारकर्ली किनाऱ्यावर तीन पर्यटक बुडाले, एका मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Sep 20, 2023 08:45 AM IST

tarkarli beach news : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली बीचवर तीन पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आलं आहे.

tarkarli beach news today
tarkarli beach news today (HT)

tarkarli beach news today : महाराष्ट्रातील अने शहरांमध्ये गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळत असतानाच आता कोकणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटक मालवण येथील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर बुडाले आहे. यापैकी एका पर्यटकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला असून अन्य दोघांना वाचवण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली आहे. सुफियान दिलावर शेख असं समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तो कणकवली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. समुद्रातून बाहेर काढण्यात आलेल्या अन्य दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रहिवासी शावेझ शेख, सुफियान शेख, झैद शेख, मतीन शेख आणि अरबाज शेख हे दुचाकीने समुद्रकिनारा फिरण्यासाठी आले होते. मालवण आणि तारकर्ली बीच फिरत असतानाच सर्वांनी पोहण्याचा प्लॅन आखला. समुद्रात उतरताच सुफियान आणि अरबाज हे समुद्रात वाहू लागले. दोघांनी आरडाओरडा करताच उपस्थितांनी तातडीने समुद्रात धाव घेत वाचवण्याचे प्रयत्न केले. यावेळी अरबाज आणि मतिन यांना स्थानिक नागरिकांनी पाण्याबाहेर काढलं. परंतु सुफियान हा समुद्रात बेपत्ता झाला होता. अखेरीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुफियानचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जखमी मतीन आणि अरबाज यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुफियानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आता पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर