Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून पिंपरी- चिंचवडमध्ये एकावर गोळीबार! कट रचून हत्येचा प्रयत्न
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून पिंपरी- चिंचवडमध्ये एकावर गोळीबार! कट रचून हत्येचा प्रयत्न

Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून पिंपरी- चिंचवडमध्ये एकावर गोळीबार! कट रचून हत्येचा प्रयत्न

May 15, 2024 04:18 PM IST

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी- चिंचवडमधील चिखली गोळीबाराच्या घटनेनेने हादरले. व्यावसायिक स्पर्धेच्या वादातून एका दुसऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

व्यावसायिक स्पर्धेच्या वादातून पिंपरीचिंचवड येथे एकावर  गोळीबार करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
व्यावसायिक स्पर्धेच्या वादातून पिंपरीचिंचवड येथे एकावर गोळीबार करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी- चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांचा खून करण्याच्या देखील घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना चिखली येथे उघकडीस आली आहे. एकाने व्यावसायिक स्पर्धेच्या वादातून दुसऱ्या एका व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात तानावांचे वातावरण असून गोळी लागल्याने दूसरा व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे.

Mumbai Metro News : नरेंद्र मोदी आज मुंबईत! सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा संध्याकाळी बंद

अजय सुनील फुले (वय१९, रा. मोहननगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुण व्यावसायिकाचे आहे. हर्षल सोनवणेला (रा. जाधववाडी, चिखली) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी हर्षल याच्या सोबत श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Mahadev Bet App: महादेव ॲप बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात! नारायणगाव येथून ७० ते ८० जणांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या अजय याचा गॅस शेगडीचा व्यवसाय आहे. गोळीबार केलेला आरोपी हर्षलचा सुद्धा हाच व्यवसाय आहे. याच व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरू आहे. यामुळे हर्षलने अजयला त्याची स्पर्धा दूर करण्यासाठी अजयला मारण्याचा कट रचला. दरम्यान, दोघांमध्ये वाद मिटावा यासाठी शाम व लिलारे हे दोघे अजयच्या दुकानात आले. दरम्यान, त्यांची चर्चा सुरू असतांना हर्षल हा सुद्धा त्याठिकाणी गेला. यावेळी हर्षलने पिस्टल काढत तीन गोळ्या अजयवर झाडल्या. यातील एक गोळी ही अजयच्या दंडावर लागली तर दुसरी गोळी ही किर्तीकुमार लिलारेच्या ह्याच्या मानेला लागली.

चाकणच्या नाणेकरवाडीतुन आरोपीला अटक

दोघांनाही तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांच्यावर जवळील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हर्षलने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने हा गोळीबाराचा कट आखला. यातून त्याने अजय फुलेवर गोळीबार केला. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी हर्षल हा फरार झाला होता. चिखली पोलीस त्याच्या मागावर होते. हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने हर्षलचा पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून त्याला अटक केली.

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर