मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : ठाकरे व शिंदे गटाचे दसरा मेळावे पडले पार.. मात्र गर्दी खेचण्यात कोणी मारली बाजी?

Dasara Melava : ठाकरे व शिंदे गटाचे दसरा मेळावे पडले पार.. मात्र गर्दी खेचण्यात कोणी मारली बाजी?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 06, 2022 05:04 PM IST

दोन्ही गटाकडून गर्दी खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू होती.

ठाकरे व शिंदे गटाचे मेळावे
ठाकरे व शिंदे गटाचे मेळावे

मुंबई– गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला व खूप महत्व प्राप्त झालेला शिवसेनेचा दसरा मेळावा काल (बुधवारी) पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क (शिवतीर्थ) वर आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत पाड पडला. दोन्ही गटाकडून गर्दी खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवण्यात बाजी मारली आहे. बीकेसी मैदानावर सव्वा लाखाडून अधिक लोक आल्याची माहिती दिली जात आहे. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ६५ हजार शिवसैनिक आले होते.

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिंदे गटाने आपला वेगळा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर भरवला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बोलावण्यात आले होते. संपूर्ण राज्यातून १८०० बसेस, ३ हजार खासगी वाहने भरून लोक बीकेसीतील मेळाव्यासाठी आले होते.

एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानाची क्षमती शिवाजी पार्कहून तीन ते चार पट मोठी आहे. दोन्ही मैदाने शिवसैनिकांकडून खचाखच भरली होती. त्यामुळे या मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संख्या जास्त असणार अशी शक्यता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या मेळाव्याला अंदाजे १ लाख २५ हजार कार्यकर्ते जमा झाले होते.

 

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या