मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  alandi blast : आळंदी जवळील साळू येथे कंपनीत भीषण स्फोट; २ ठार, ७ जखमी

alandi blast : आळंदी जवळील साळू येथे कंपनीत भीषण स्फोट; २ ठार, ७ जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 09, 2024 12:11 AM IST

alandi blast : आळंदीत आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भीषण स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. ही घटना आळंदीतील साळू गावात घडली. सुरवातीला डीपीचा स्फोट झाल्याची माहिती होती.

 alandi blast
alandi blast

alandi blast : आळंदीत आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भीषण स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. ही घटना आळंदीतील साळू गावात घडली. सुरवातीला डीपीचा स्फोट झाल्याची माहिती होती. मात्र, या विद्युत रोहित्रा जवळ बंद असलेल्या कंपनीत स्फोट झाला असून यामुळे डीपीचा स्पॉट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या स्फोटामुळे तब्बल पन्नास मीटर अंतरातील परिसरात हादरला. तसेच मोठी हानी झाली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बसवराज तमला बनसोडे (वय ५०, रा. सोळू, ता, खेड) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एकाचे नाव आहे. तर दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही. या घटनेत अब्दुल सलम खान (रा. सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश), दिनेश राम कृष्ण मोर्य (वय २०, रा. सोलू, खेड), रामचंद्र मारुती निंबाळकर (वय ८१, रा. सोळू, ता खेड), मोनू गौतम (रा. कुदळवाडी, चिखली), संतोष त्र्यंबक माने (वय ५०, रा. आळंदी) हे भाजल्याने जखमी झाले आहेत.

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; फायरिंगचा VIDEO आला समोर, हल्लेखोराचीही आत्महत्या

आज सायंकाळी ०५.०९ च्या सुमारास सोलू आळंदी मरकल रोड येथील स्पेसिपिक आलोय प्रा. लिमिटेड या कंपनीत आग लागली होती. ही कंपनी आंदाजे चार वर्षापानसून बंद स्थितीत आहे, या कंपनीत आधी आग लागून कंपनी व कंपनीच्या बाजूला असलेले ट्रान्सफॉर्मर यांच्यात मोठा स्पोटा झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला असून मोठी आग लागली. अंदाजे शंभर मीटर एरिया मध्ये आगीच्या ठिणग्या उडाल्यामुळे कंपनी ही गावठाण परिसरातील असल्यामुळे गवताच्या गंजी, गुरांचा चारा तसेच गुरांना देखील हानी झाली, चार चाकी वाहने, दुचाकी वाहाने, तसेच घरांचे नुकसान झाल्याचे निर्शनास आले. अग्निशमन विभाग, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल, आळंदी नगरपरिषद, पुणे महानगर पालिका अग्निशमन दल या अग्निशमन वाहनांच्या तात्काळ मदतीने आग लवकर आटोक्यात आणण्यात आली , तात्काळ मदद मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या घरांना सुरक्षित करण्यात आले, आगीच्या ठिकाणी आठ जखमी व्यक्ती आढळले. त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णांलय येथे पाठवण्यात आले.

गृहमंत्री अदृश्य..राज्य गुंडांच्या तावडीत; फडणवीसांनी राजीनामा द्यावा, घोसाळकरांच्या हत्येनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

आळंदीजवळील सोळू गावातील आगीशी महावितरणचा संबंध नाही

 आळंदी नजीकच्या सोळू गावात (ता. खेड) गुरूवारी (दि. ८) दुपारी साडेचारच्या सुमारास महावितरणच्या वितरण रोहित्राचा (Distribution Transformer) स्फोट होऊन काही घरांना आग लागल्याची माहिती चुकीची आहे. या आगीशी काहीही संबंध नाही तसेच वीजबिलाच्या थकबाकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आळंदी नजीक मरकळ रस्त्यावरील सोळू (ता. खेड) या गावात आज दुपारी आग लागली. या ठिकाणी असलेल्या वितरण रोहित्राचा (Distribution Transformer) स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महावितरणच्या चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. विजय गारगोटे व सहायक अभियंता श्री. संदीप कुऱ्हाडे यांनी तातडीने सोळू येथे वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये घटनास्थळी असलेल्या ६३ केव्हीए क्षमतेच्या रोहित्राचा प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे आढळून आले नाही. तसेच आग लागल्याचे देखील दिसून आले नाही.

आग विझवल्यानंतरही हा रोहित्र सुस्थितीत असल्याचे आढळून आले. मात्र बाजूची भिंत पडल्याने रोहित्राचे वीजखांब वाकले आहेत. आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की, या रोहित्रावरून केवळ एका ग्राहकाला वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र संबंधित ग्राहकाचे वीजबिल थकीत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सोळू येथील आगीशी महावितरणच्या रोहित्राचा कोणताही संबंध नसल्याचे घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.

WhatsApp channel

विभाग