वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळले ब्लेड आणि दगड, नराधमांनी गाठला क्रूरतेचा कळस
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळले ब्लेड आणि दगड, नराधमांनी गाठला क्रूरतेचा कळस

वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळले ब्लेड आणि दगड, नराधमांनी गाठला क्रूरतेचा कळस

Jan 24, 2025 09:55 AM IST

Rape on Vasai Beach: मुंबईतील वसई बीचवर एकाने २० वर्षीय तरुणीवर अमानुषपणे बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. पीडित तरुणी ही बीचवर पडून होती.

वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळलले ब्लेड आणि दगड, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस
वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळलले ब्लेड आणि दगड, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

Rape on Vasai Beach: मुंबईत महिलांवरील अत्याचार वाढतच चालले आहे. वसई बीचवर एका २० वर्षीय तरुणीवर एकाने अमानुषपणे बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. आरोपीने तरुणीच्या गुप्तांगात ब्लेड, वाळू व दगडी टाकत क्रूरतेचा कळस गाठला. बलात्कार झाल्यावर पीडित तरुणी बीचवरच रडत बसली होती. तिला गंभीर अवस्थेत पाहून स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत तरुणीची चौकशी केली असता, तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं. आरोपीने तिच्यावर बीचवर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. वसई बीच हा गजबजलेला परिसर असतांना बीचवर फिरण्यासाठी आलेल्या या तरुणीवर कुणी अत्याचार केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनराई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिस येथील सीसीटीव्ही देखील तपासत आहेत.

काय आहे घटना ?

पीडित तरुणी ही वसई बीचवर २२ जानेवारी रोजी फिरण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तरुणीवर बळजबरी करत अमानुषपणे बलात्कार केला. यानंतर आरोपी हा फरार झाला. अत्याचार झाल्यावर ही तरुणी ही गोरेगाव ई रेल्वे स्थानकाजवळ बसून रडत होती. यावेळी येथून जाणाऱ्या एकाने या तरुणीला पाहिले. टीची अवस्था पाहून काही तरी चुकीचे झाले समजून या व्यक्तिने याची माहिती गोरेगाव वनराई पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटणस्थळ गाठले. यावेळी पीडित तरुणी ही तिथेच रडत होती. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन टीची चौकशी केली. यावेळी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

गुप्तांगात आढळले ब्लेड आणि दगड

पोलिसांनी पीडित मुलीला दवाखान्यात भरती केले. या ठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत तिच्या प्रायव्हेट गुप्तांगात १ ब्लेड व २ दगड सापडले. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल आहे. तसेच पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर