मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Traffic News : शिवजयंतीनिमित्त आज पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत मोठा बदल, ‘या’ रस्त्यावरील वाहतूक वळवली

Pune Traffic News : शिवजयंतीनिमित्त आज पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत मोठा बदल, ‘या’ रस्त्यावरील वाहतूक वळवली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 19, 2024 05:40 AM IST

Pune Traffic News : श्री शिवजयंतीनिमित्त आज पुण्यातील मध्य वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे जर आज बाहेर पाडण्याचे नियोजन असेल तर वाहतूक बदलांची नोंद घेऊन बाहेर पडावे लागणार आहे.

Pune Traffic
Pune Traffic

Pune Traffic News : पुणेकरांनो जर आज बाहेर पडण्याचा विचार करणार असाल तर ही बातमी वाचा. आज शिवजयंती निमित्त पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. प्रमुख्याने छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक बदलांची नोंद घेऊन घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rohit Pawar : बारामतीत 'मलिदा गँग' करतेय 'दादागिरी'; रोहित पवारांचा अजित पवार गटावर घणाघाती वार!

श्री शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन आज मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत स्वराज्य रथ सहभागी होणार आहेत. मध्यभागातील प्रमुख रस्त्यांवरुन मिरवणूक काढण्यात येणार असल्याने सोमवारी सकाळी सातनंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

अभिनेते प्रकाश राज यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; पॅलेस्टाईनची तुलना केली काश्मीरशी, VIDEO व्हायरल

हे आहेत पर्यायी मार्ग-

जिजामाता चौक येथुन शिवाजी रोड वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक टिळक चौक टिळक रोडने इच्छितस्थळी जातील.

गणेश रोड दारुवाला पुलाकडुन फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक ही दारुवाला पुल चौकातुन इच्छितस्थळी जातील.

केळकर रोडने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकते नुसार वळविण्यात येईल.

मिरवणुक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड वरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतुन वळविण्यात येईल.

पुरम चौकातुन बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणा-या वाहन चालकांसाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील.

मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रोडने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.

मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.

मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहने शनिवार वाड्याकडे न जाता ती कॉसमॉस बैंक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जातील.

स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छित स्थळी जातील.

IPL_Entry_Point

विभाग