कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल! असे राहणार पर्यायी मार्ग
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल! असे राहणार पर्यायी मार्ग

कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल! असे राहणार पर्यायी मार्ग

Updated Dec 30, 2024 01:10 PM IST

Pune Traffic update News : पुण्यात १ जानेवारी २०२५ रोजी कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी पुणे नगर मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर दुपारी दोन वाजल्यापासून हा वाहतूक बदल लागू होणार आहे.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल! असे राहणार पर्यायी मार्ग
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल! असे राहणार पर्यायी मार्ग

Pune Traffic update News : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमानिमित्त पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हा वाहतूक बदल मंगळवारी (दि ३१) दुपारी २ पासून लागू केला जाणार आहे. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी अनुनायी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे वाहतूक बदलाचे वा पर्यायी मार्गाचे माहिती देणारे फलक जागोजागी लावले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

असे असेल वाहतूक

पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे वळावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.

तर कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरुकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरुन केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

अवजड वाहनांना बंदी

शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधीमल राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीत मंतरवाडी फाटा, मरकळ पुल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

'या' ठिकाणी लावता येणार वाहने

विजयस्थंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहने लावण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, मोनिका हाॅटेलशेजारी, ओमसाई हॉटेलच्या पाठीमागे, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी, तुळापूर रस्ता वाय पॉइंट, हॉटेल गणेश मिसळजवळ, तुळापूर रस्ता हॉटेल शेतकरी मिसळ शेजारी, निसर्ग लॉज शेजारी, फुलगाव सैनिकी शाळा मैदान, थेऊर रस्ता, सोमवंशी ॲकडमी शेजारी, खंडोबाचा माळ, पेरणे फाटा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर