मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  old pension Scheme : 'जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?'

old pension Scheme : 'जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 25, 2023 07:13 PM IST

Congress slams devendra Fadnavis over old pension scheme: जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

old pension scheme : ‘विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. त्यावरून काँग्रेसनं फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या कपटनीतीची शिक्षकांनाही कल्पना आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक होती तर पाच वर्षे मुख्यमत्री असताना त्यांनी झोपा काढल्या काय? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनंच २००३ साली जुनी पेन्शन योजना बंद करून नॅशनल पेन्शन योजना (NPS) लागू केली होती. मात्र, फडणवीस धादांत खोटं बोलून त्याचं खापर काँग्रेस सरकारवर फोडत आहेत. भाजप नेते आरएसएसच्या शिकवणुकीनुसार धादांत खोटं बोलण्यात पटाईत असतात. त्याच शिकवणुकीनुसार फडणवीसांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचं खापर काँग्रेसवर फोडलं. नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणं सरकारला शक्य नाही असं त्यांनीच सांगितलं होतं. मग आताच फडणवीस यांच्यात धमक कुठून आली. नागपूरच्या अधिवेशनात किंवा मागील ५ वर्षे मुख्यमंत्री असताना ही धमक कोठे गेली होती?, असा प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केला.

काँग्रेस केवळ बोलून थांबलेली नाही!

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा केवळ पाठिंबाच नसून काँग्रेसशासित राज्ये राजस्थान, छत्तीसगड, व हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना लागूही केली आहे. ही राज्ये जुनी पेन्शन योजना राबवू शकतात तर मग महाराष्ट्र हे तर प्रगत राज्य आहे, ही योजना लागू केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडेल हे फडणवीसांचं म्हणणं चुकीचं वाटतं. सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव व काँग्रेसशासित राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्यानं फडणवीसांचा विचार बदललेला दिसतो. काहीही झालं तरी जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, असं लोंढे म्हणाले.

WhatsApp channel