मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात वृद्ध व्यक्ति सेक्सटॉर्शनचा बळी! न्यूड कॉलचा स्क्रीनशॉट पाठवून साडेचार लाखाला गंडवले

Pune Crime : पुण्यात वृद्ध व्यक्ति सेक्सटॉर्शनचा बळी! न्यूड कॉलचा स्क्रीनशॉट पाठवून साडेचार लाखाला गंडवले

Jul 07, 2024 08:14 AM IST

Pune sextortion Crime : पुण्यात सेक्सटॉर्शनच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात एका जेष्ठ व्यक्तीला देखील या प्रकारे फसवल्याचे पुढे आले आहे.

पुण्यात वृद्ध व्यक्ति सेक्सटॉर्शनचा बळी! न्यूड कॉलचा स्क्रीनशॉट पाठवून साडेचार लाखाला गंडवले
पुण्यात वृद्ध व्यक्ति सेक्सटॉर्शनचा बळी! न्यूड कॉलचा स्क्रीनशॉट पाठवून साडेचार लाखाला गंडवले

Pune Crime : पुण्यात सेक्सटॉर्शनच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात एका जेष्ठ व्यक्तीला देखील या प्रकारे फसवल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तीला एका महिलेने न्यूड कॉल केला. यानंतर काही वेळातच त्याच्या फोनवर न्यूड कॉलचा स्क्रीनशॉट पाठवून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर हे फोटो तुमच्या नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीला पाठवू अशी धमकी देखील दिली. या मुळे या वृद्ध व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला चार लाख रुपये दिले. मात्र, आणखी पैशाची मागणी केल्याने त्रस्त झालेल्या वृद्ध व्यक्तीने पोलिसांत धाव घेत हा प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाची सेक्सटॉर्शन करून फसवणूक करण्यात आली. ही घटना शुक्रावारी (दि. ५) घडली. जर तुमची बदनामी तळायची असेल तर हे पैसे द्या अशी धमकी देखील आरोपींनी दिली. बदनामीच्या भीतीपोटी वृद्ध फिर्यादीने ४ लाख ४० हजार रुपये त्यांना दिले. मात्र, त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. यामुळे त्रस्त झालेल्या आरोपीने थेट पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली.

नेमके काय झाले ?

या वृद्ध व्यक्तीला एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. प्रोफाईल फोटो व मुलीचे नाव बघून संबंधित व्यक्तीने हा फोन कॉल उचलला. या नंतर त्याच्या समोर एक एक अवस्थेतील मुलीने त्याच्याशी संवाद साधला. दरम्यान, काही वेळताच फिर्यादीच्या व्हॅट्सऍपवर ७-८ फोटो आले. यात ते एका मुलीबरोबर अश्लील कृत्य करत असल्याचे भासवणारे 'स्क्रीनशॉट' होते. हे पाहून या वृद्ध व्यक्तीला मोठा हादरा बसला. तसेच आरोपीने त्यांना हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना बँक खाते पाठवून त्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. आरोपीने हे फोटो नातेवाईक, मित्र मैत्रिणीला पाठवण्याची आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने त्यांना ४ लाख ४० रुपये दिले.

सेक्सटॉर्शंन पासून वाचण्यासाठी हे करा

जर तुम्हाला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून किंवा इंटरनेट आयडीवरून व्हिडीओ कॉल आला असल्यास तो उचलू नका. तसेच जर एखाद्या व्यक्तीला भेटायचे असल्यास त्यासाठी सार्वजनिक ठिकाणे निवडा. अशा कुणालाही भेटणार असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला याची माहिती किंवा पूर्वकल्पना द्या. जर काही गडबड वाटत असेल तर थेट संवाद थांबबा.

WhatsApp channel
विभाग