Pune Ola uber ban : पुण्यात ओला उबरला पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ओला आणि उबेरला अॅग्रिगेटर परवाना नाकारल्यानंतर ओला आणि उबेर बंद केल्याने पुणे वाहतूक पोलिस आणि आरटीओ कडून ओला, उबेरसह अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या टॅक्सीचालकांवर कारवाईची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी तब्बल ४० टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या भीतीमुळे अॅपद्वारे प्रवासी सेवा देणाऱ्या टॅक्सी सेवा गायब झाल्या आहेत.
पुण्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ओला आणि उबेर या टॅक्सी सेवेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आता ओला आणि उबेर पुण्यात टॅक्सीसेवा देऊ शकणार नाही. याचा फटका या सेवेचा लाभ घेणाऱ्या हजारो पुणेकरांना बसत आहे. या बंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सूरवत झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाकडून गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारीही देखील आरटीओने अनेक ऑल ऊबेर टॅक्सीवर कर्वी करत ४० टॅक्सी जप्त केल्या, तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईची माहिती इतर संपल्यावर इतर टॅक्सी चालकांनी आपली सेवा देणे बंद केले. नागरिक ऑनलाइन ओला आणि उबेरच्या टॅक्सी बूक करत होते. मात्र, चालक कारवाईच्या धास्तीने बूकिंक स्वीकारत नव्हते. यामुळे पुण्यातील विविध भागात या प्रकारच्या सेवा बूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
पुणे आरटीओने बैठकीनंतर अॅपद्वारे सेवा पुरविणाऱ्या टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत गुरुवारी १३ टॅक्सीचालकांवर तर शुक्रवारी तब्बल ४० टॅक्सी जप्त केल्या.
दरम्यान, टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी ५० आरटीओ अधिकारी बाहेर पडले आहेत, अशी अफवा गुरुवारच्या रात्री टॅक्सीचालकांमध्ये पसरली. त्यामुळे विमानतळावर असलेल्या एरोमॉलमध्ये रात्रीच टॅक्सीचालकांनी सेवा थांबविली. परिणामी, येथे चांगलाच गोंधळ उडाला. टॅक्सी सेवा थांबल्यामुळे रात्री विमानाद्वारे बाहेरून पुण्यात येणाऱ्या विमानप्रवाशांना बराच वेळ वाहन मिळाली नाही. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
संबंधित बातम्या