मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : आता राज्यभर आक्रोश आंदोलन; मराठा आरक्षणाच्या आदेशाची होळी करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा संताप

Maratha Reservation : आता राज्यभर आक्रोश आंदोलन; मराठा आरक्षणाच्या आदेशाची होळी करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा संताप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2024 04:06 PM IST

Prakash Shendge on Maratha Reservation : जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हास्वत:ला ९६कुळी मराठा म्हणू शकत नाही. कुणबी दाखल्याने राज्यातील मराठ्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. असं प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.

Prakash shendge
Prakash shendge

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं असून आरक्षणाच्या संदर्भातील मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे. यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीसंताप व्यक्त करत सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या अध्यादेशाची आम्ही होळी करु,असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

सरकारच्या आदेशाने ओबीसी समाजाची सगळ्यात मोठी फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला असून आमचं आरक्षण लुटलं आहे. सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी सेल बरखास्त करावं, असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केलं.

प्रकाश शेंडगे म्हणाले की, सरकारच्या आदेशाचीआम्ही होळी करू. याविरोधात राज्यभर आक्रोश आंदोलनकेले जाईल, तसेच ओबीसींसाठी नवा पक्ष उभारू, असं प्रकाश शेंडगे म्हणाले. सरकारने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिलं आहे. राज्यातील १०० टक्के मराठा समाजाला कुणबी दाखले देऊनत्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जरांगे पाटील आणि सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. मात्र यात खरंच मराठा समाजाचा फायदा की तोटा? हे लवकरच स्पष्ट होईल.जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा स्वत:ला ९६ कुळी मराठा म्हणू शकत नाही. कुणबी दाखल्याने राज्यातील मराठ्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे आता कुणबी तेतुका मेळवावा असं म्हणावं लागेल.

सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं. शपथपत्र, सगेसोयरे, गणगोत असं जातीचे वर्गीकरण होऊ शकत नाही. हे घटनेत बसत नाही. हा घटनेशी धोका आहे. राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा आधिकार नाही. आम्ही राज्यपालांना भेटूनआमच गाऱ्हाणं मांडणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

WhatsApp channel