Pune girl rape : अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून ‘ब्लॅकमेल’ करून केला बलात्कार! पिडीतेचा आत्महत्येचा प्रयत्न
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune girl rape : अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून ‘ब्लॅकमेल’ करून केला बलात्कार! पिडीतेचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune girl rape : अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून ‘ब्लॅकमेल’ करून केला बलात्कार! पिडीतेचा आत्महत्येचा प्रयत्न

Apr 13, 2024 03:23 PM IST

Pune girl rape : पुण्यात एका अल्पवयीन मुलीची ओळख करून तिचा चोरून नग्न व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार (Pune Crime) करण्यात आल्याची घटना उघकडीस आली आहे.

अल्पवयीन मुलीची अश्लील व्हिडिओ काढून ‘ब्लॅकमेल’ करून केला बलात्कार
अल्पवयीन मुलीची अश्लील व्हिडिओ काढून ‘ब्लॅकमेल’ करून केला बलात्कार

Pune girl rape : पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना उघकडीस आली असून आरोपीने एका अल्पवयीन मुलीची ओळख करून घेत तिचा विश्वास संपादन करत तिला कळू न देता तिचा नग्न व्हिडिओ काढला. त्यानंतर हा व्हिडिओ मुलीला दाखवत तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. हा त्रास सहन न झाल्याने मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता.

Pulses Price Hike : डाळींचे भाव कडाडले! तूरडाळ १५, तर मूगडाळ १० रुपयांनी महाग; 'हे' आहेत नवे दर

कपिल रवींद्र वाल्हेकर (वय १८, रा. कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व पिडीत मुलीची सिंहगड कॅम्पसमधील सौ. वैणुताई पोलि. कॉलेजमध्ये ओळख झाली होती. आरोपीने पिडीतेशी मैत्री वाढवली. तिचा विश्वास संपादन करत त्याने जानेवारी २०२४ मध्ये ही मुलगी घरी एकटीच असताना तो टीच्या घरी गेला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील त्याने तिच्याशी संबंध ठेवले. यानंतर तिचा नग्न व्हिडीओ तयार करण्याचे त्याने पीडितेला म्हटले. मात्र, याला तिने नकार दिला. याचा त्याला राग आल्याने त्याने चिडून पिडीत मुलीच्या घरातील बाथरुममधील खिडकिची काच तोडून तिच्या नकळत तिच्या आंघोळीचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ त्याने पीडित मुलीला दाखवला. यानंतर तिला ब्लॅकमेल करत सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. यानंतर त्याने अनेकवेळा तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला.

Sydney terror attack: सिडनीत मॉलमध्ये माथेफिरुचा चाकूहल्ला! चौघांचा मृत्यू; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार

आरोपी कपिलने ८ एप्रिलला पुन्हा या मुलीला फो करून भेटायला बोलावले. यावेळी त्याने तिला मानसिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिने घरातील फिनेल पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. तिला ओकारी झाल्याने आणि त्रास वाढल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार केल्यावर तिला घरी सोडले. त्यानंतर आरोपीने पुन्हा शुक्रवारी १२ एप्रिल २०२४ला तिला फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. पिडीत मुलीने त्याला घरी बोलावून घेतले. आईवडिलांसमक्ष घडलेला सर्व प्रकार मुलीने सांगितला. त्यानंतर, कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, आरोपी वाल्हेकर याने देखील परस्पर तक्रार दाखल करत पिडीत मुलीच्या कुटुंबियांच्याणी हातपाय बांधून मारहाण केल्याची तक्रार दिली. मुलीसोबत प्रेमसंबंध होते, मात्र, तिच्या घरच्यांनी याला विरोध केल्याने मुलगी फिनेल प्यायल्याचा आरोप त्याने केला. त्यामुळे तो तिला भेटायला घरी गेला असता मुलीच्या वडिलांनी, आईने व मामाने त्याला बांधून मारहाण केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर